TET Exam Scam; राज्य परीक्षा परिषदेच्या ‘आयुक्त’पदावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे याला पुणे पोलिसांनी अटक करण्यात आली
TET Exam Scam; राज्य परीक्षा परिषदेच्या ‘आयुक्त’पदावर प्रश्नचिन्ह
TET Exam Scam; राज्य परीक्षा परिषदेच्या ‘आयुक्त’पदावर प्रश्नचिन्हSaam Tv

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (TET) गैरव्यवहार प्रकरणी परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe) याला पुणे पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आला, त्यानंतर सुपे यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु, या गैरव्यवहारामुळे आता परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारण्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे नकार येऊ लागला आहे.

मागील १० दिवसांपासून आयुक्त पद रिक्त असल्यामुळे परीक्षा परिषदेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभाग (Health Department), म्हाडा (MHADA) पेपरफुटी प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी (police) टीईटी परीक्षेच्या निकालात फेरफार करून उमेदवारांचे गुण वाढविल्याच्या कारणावरून परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांना १७ डिसेंबर रोजी अटक (Arrested) करण्यात आली आहे. सुपे यांना पोलिस कोठडी देखील देण्यात आली आहे.

हे देखील पहा-

त्यानंतर शिक्षण विभागाने सुपे यांना निलंबित करण्याची कार्यवाही केली आहे. यानंतर हे आयुक्त पद रिक्त झाले आहे. दरम्यान, टीईटी (TET) गैरव्यवहाराने चर्चेत आलेल्या परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास शिक्षणाधिकारी नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे. परिषदेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे द्यायचा असा प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण झाला होता. सध्या परीक्षा परिषदेमध्ये हारून आत्तार आणि शैलजा दराडे हे २ उपायुक्त कार्यरत आहेत.

त्यापैकी कोणाला तरी आयुक्तपदाची सूत्रे देणे, सद्यःस्थितीत सोयीचे ठरणार आहे, असा विचार शिक्षण विभागाकडून करण्यात आला. त्यानुसार आत्तार यांच्याकडेच आयुक्तपदाची सूत्रे देण्यावर ठरविण्यात आले होते. परंतु, आत्तार यांनी हा अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यात स्पष्ट नकार दर्शविला आहे. आत्तार यांच्याकडे परीक्षा परिषदेतील उपायुक्तपदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयात सहसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार याअगोदर त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

TET Exam Scam; राज्य परीक्षा परिषदेच्या ‘आयुक्त’पदावर प्रश्नचिन्ह
शेतकऱ्यांची चिंता वाढणार; राज्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

यामुळे असे असताना आणखी एक जबाबदारी स्वीकारल्यास तिन्ही पदांची सूत्रे सांभाळणे शक्य होणार नाही, तसेच एखाद्या पदाला योग्य न्याय देता येणार नाही. यामुळे परीक्षा परिषदेच्या आयुक्त पदांची जबाबदारी सांभाळण्यासाठी दुसऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांची निवड करावी, असे सुचवीत आत्तार यांनी आयुक्तपदाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, आता १० दिवस उलटून गेले आहे, तरी परीक्षा परिषदेला आयुक्त पद अद्याप आजून देखील रिक्त असल्याने अनेक प्रलंबित कामे खोळंबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com