Sakinaka बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं: देवेंद्र फडणवीस

जर अशा घटना वारंवार घडल्या तर राज्यात महिलांमध्ये असुरक्षितेची भावना तयार होईल.
Sakinaka बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं:  देवेंद्र फडणवीस
Sakinaka बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं: देवेंद्र फडणवीस
Published On

साकिनाका बलात्कार (Sakinaka rape case) पीडितेचा मृत्यू मनाला चटका लावणारा आहे. मुंबई लौकिक सेफ सिटी म्हणून आपण बघतो, पण आता तरी राज्यसरकारने फास्ट ट्रॅक कोर्टात (Fast Track Court) या प्रकरणाचा खटला चालवावा आणि या घटनांमधील नराधमांनी फाशीची शिक्षाच व्हावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच राज्यसरकारने याबाबत प्रयत्न करावेत असेही फडणवीसांनी म्हटले आहे.

हे देखील पहा-

तसेच, राज्यसरकारचा शक्ती कायदा राज्यात दिड वर्षांपासून प्रलंबित आहे. पण जर अशा घटना वारंवार घडल्या तर राज्यात महिलांमध्ये असुरक्षितेची भावना तयार होईल. मात्र सध्या आपल्याकडे असलेल्या कायद्याचा वापर करुन आपण फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकणाचे खटले चालवून नराधमांना शिक्षा देऊ शकतो. असेही त्यांनी म्हटले आहे. राज्यसरकार महिला आयोगावर महिला अध्यक्ष नेमण्याबाबत आश्वासन देतात, पण सरकारने अजून कारवाई केली नाही. कारण महिला आयोगावर अध्य़क्ष नेमण्यासाठी सरकारला फुरसत नाही.

Sakinaka बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं:  देवेंद्र फडणवीस
Sakinaka rape case: महिलांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका: चित्रा वाघ

गेल्या काही दिवसांत अनेक पोलीस अधिकारी मला भेटत आहेत. पोलीस विभागात काय चालले याचा विचार करायची गरज आहे. पोलीस दलात बदल्यांच्या संदर्भात कारभार सुरु आहेत. सरकारने, मनाला वाट्टेल तशा अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. इतकेच नव्हे तर, काल पोलीस दलात झालेल्या बदल्या नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे अनेक आयपीएस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवले, त्यामुळे पोलीस दलात प्रचंड नाराजी असल्याचा आरोप, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. मला अनेक अधिकारी भेटतात, त्यांना का भेटत नाहीत, असे त्यांना वाटत असेल तर त्यांना त्याबाबत आत्मचिंतन करणे गरजेचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com