Sakal-Saam TV Survey: राष्ट्रवादीतील 'पॉवर गेम', नेतृत्व 'साहेबां'चंच मान्य, सकाळ-साम सर्व्हेतून महाराष्ट्राला मिळालं नेमकं उत्तर

Sakal-Saam TV Survey on Sharad Pawar Resigns : राष्ट्रवादीतील 'पॉवर गेम', नेतृत्व 'साहेबां'चंच मान्य, सकाळ-साम सर्व्हेतून महाराष्ट्राला मिळालं नेमकं उत्तर
Sakal-Saam TV Survey
Sakal-Saam TV SurveySaam TV
Published On

Sakal-Saam TV Survey on Sharad Pawar Resigns: शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकारणात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केल्यानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'सकाळ-साम सर्व्हे' (Sakal-Saam TV Survey) करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना अजूनही शरद पवार हेच अध्यक्षपदी हवे आहेत. तर इतर लोकांचं म्हणणं आहे की, पवार यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे.

Sakal-Saam TV Survey
Saam Survey: शरद पवारांचा उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे? समर्थकांचा कल समोर

Sharad Pawar Resigns Sakal-Saam TV Survey : कसा केला सर्व्हे?

सकाळ-साम सर्व्हेमध्ये शरद पवार यांच्या घोषणेनंतर सर्वपक्षीय समर्थकांचा कल जाणून घेतला आहे. यात फक्त राष्ट्रवादी नाही तर इतर पक्षातील कार्यकर्त्यांचं मत देखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये हा सर्व्हे केला आहे. यात सर्व वयोगटातील महिला आणि पुरुषांचा समावेश आहे.  (Latest Marathi News)

Sakal-Saam TV Survey
NCP New President: पवारांचा उत्तराधिकारी कोण? विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल? पक्षाच्या घटनेत काय आहे तरतुद?

यात सर्व्हेत पहिला प्रश्न असा विचारण्यात आला की, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याबद्दल आपल्याला काय वाटतं? यावर खालील प्रमाणे लोकांनी आपली मत नोंदवली आहेत.

1. योग्य केलं, नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी 48%

2. अध्यक्षपद सोडू नये 46%

3. सांगता येत नाही 6%

राष्ट्रवादी समर्थक

1. योग्य केलं, नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी - 25%

2. अध्यक्षपद सोडू नये 73

3. सांगता येत नाही 2%

राष्ट्रवादी वगळता इतर पक्ष

1. योग्य केलं, नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी 56

2. अध्यक्षपद सोडू नये 36

3. साांगता येत नाही 8

या सर्व्हेवर बोलताना सकाळ समूहाचे संचालक संपादक श्रीराम पवार म्हणाले की, ''शरद पवार यांचा राजीनामा फक्त राष्ट्रवादी काँग्रेससाठी धक्का नाही, हा सगळ्या पक्षासाठी आणि सामान्यांसाठीही धक्का आहे.''

ते म्हणाले, ''या सर्व्हेत आम्ही असा प्रयत्न करत होतो की, जे प्रामुख्याने राजकारणाशी जोडलेले आहेत. अशा वेगवेगळ्या पक्षातील समर्थकांना, याबद्दल काय वाटतं? ते याकडे कसं बघतात. तसेच पवार यांचा निर्णय चुकीचा की योग्य? हा फक्त इतकाच मुद्दा नाही, ते याकडे बघतात कसं, हे प्रामुख्याने समजून घेण्याचा मुद्दा आहे. यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी हे पद सोडू नये, असं वाटत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com