Russo Ukraine War : मावळातील मेहेक गुप्ता अखेर परतली घरी

लोणावळ्यात घरी आल्यानंतर घरी तिचे स्वागत फुलांच्या आणि रांगोळीच्या पायघड्या घालून करण्यात आले.
Russo Ukraine War : मावळातील मेहेक गुप्ता अखेर परतली घरी
Russo Ukraine War : मावळातील मेहेक गुप्ता अखेर परतली घरी SaamTvNews
Published On

मावळ : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांदरम्यान युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले भारतातील अनेक विद्यार्थी तिथे अडकून पडले होते. भारतात असलेल्या त्यांच्या आईवडिलांना मात्र कशा प्रकारे मुलांना सुखरूप भारतात आणावं असा प्रश्न पडला होता. यात मावळ मधील दोन मुली देखील अडकल्या होत्या. त्यातील एक मुलगी सुखरूप भारतात येऊन अखेर घरी पोहोचली आहे.

हे देखील पहा :

मेहेक गुप्ता ही युक्रेनमधून भारतात सुखरूप पोहचली आहे. लोणावळ्यात घरी आल्यानंतर घरी तिचे स्वागत फुलांच्या आणि रांगोळीच्या पायघड्या घालून करण्यात आले. युक्रेनमध्ये अडकलेल्या मेहेक गुप्ता ला पुन्हा भारतात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न घरच्यांना करावे लागले. सतत भारतातील दूतावास यांच्याशी संपर्क करून त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते.

Russo Ukraine War : मावळातील मेहेक गुप्ता अखेर परतली घरी
BMC : मुंबई महापालिकेत पत्र स्वीकारण्याची वेळ आता 5 वाजेपर्यंत

आमच्यासारखे अनेक जण तिथे अडकून पडले असतील त्यांचे देखील आईवडील सतत संपर्क करत असतील त्यामुळे तेथील फोन देखील लागत नसायचे असं मेहेकने साम टीव्हीसोबत बोलताना सांगितले. तर मेहेकला भारतात आणण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागले असं मेहेकची वाहिनी आदिती गुप्ता यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com