Rupali Patil  NCP
Rupali Patil NCPSaamtv

Pune By Election : 'मी अजून...'; गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोपानंतर रुपाली पाटील-ठोंबरे यांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रवक्त्या रुपाली पाटील यांच्या मोबाईलवरील स्टेटस फोटो ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Published on

सचिन जाधव

पुणे : पुण्यात कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक याच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत कसब्यात पाहिला मिळत आहे. आज सकाळपासून मतदानालाय सुरवात झाली आहे.

कसब्यात भाजप विरुद्ध काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. त्यातच आज मतदान करताना गुप्त पणे मतदान केलं जातं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्या व प्रवक्त्या रुपाली पाटील यांच्या मोबाईलवरील स्टेटस फोटो ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावर रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपकडून (BJP) कसब्यात हेमंत रासने तर काँग्रेस कडून रवींद्र धंगेकर निवडणूक रिंगणात आहेत. मविआ विरुद्ध महायुती अशी प्रतिष्ठेच्या लढत आहे. मात्र कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रूपाली पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला आहे असा आरोप होत होता. निवडणूक आयोग या प्रकरणाची गंभीर दखल घेणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यांनी एफबी व मोबाईल स्टेटसवर लावले आहेत, त्यामुळे खळबळ माजली होती.

Rupali Patil  NCP
Kasba Byelection: पैसे घेतले नाही म्हणून महिलांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण, गुन्हा दाखल

मात्र, हे सगळे फोटो वायरल झाल्यानंतर रुपाली पाटील यांनी सांगितले, 'मुळात मी अजून मतदान केलंच नाही. माझ्या बोटाला शाही सुद्धा नाही.त्यांना एका सुज्ञ मतदार राजाने तो फोटो मला पाठव आणि मी तो फोटो पोस्ट केला अस मत व्यक्त केलं आहे. मी फोटो पोस्ट करेन किंवा स्टेटसला ठेवेल तो माझा अधिकार विरोधकांनी काहीही टीका करू नये'.

'मी अजून मतदानाचा हक्कच बजावला नाही. उलट भाजप सरकारने पुण्यात जे काही कालपासून सुरू आहे. पैसे वाटप आरोप होतोय त्यानुसार भाजपवरच गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी रूपाली पाटील यांनी केली आहे.

Rupali Patil  NCP
Supriya Sule: राज्यातले ED सरकार दडपशाही करुन भिती दाखवते, सुप्रिया सुळेंचा घणाघात

कसबा पोटनिवडणूक भाजप आणि मविआ मध्ये सरळ लढत आहेत. त्यातच अशाप्रकारे मतदान करतानाचा व्हिडिओ फोटो काढणं गैर आहे. रुपाली पाटील यांनी त्यांच्या फेसबुक व मोबाईल स्टेटस वर फोटो टाकले आहेत. ते त्याचे फोटो नसले तरी आशा फोटोवर कारवाई निवडणूक आयोग करणार का हे पाहव लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com