Ajit Pawar : रोहित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, अजितदादा मुख्यमंत्री झाले तर...

अयोध्या दौरा केला पाहिजे मात्र, धर्माचं राजकारण करू नये - पवार
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSaam Tv
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

बारामती : अजित दादांसारखा (Ajit Pawar) नेता मुख्यमंत्री झाला तर राज्याला फायदा होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत दिवाळी पाडव्यानिमित्ताने राज्यभरातून हजारो कार्यकर्ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दाखल झाले होते.

या शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) विरोधी पक्ष नेते अजित पवार बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. या शुभेच्छांचा स्वीकार करुन झाल्यानंतर माध्यमांसह उपस्थितांशी संवाद साधत असताना रोहित पवार यांनी दादांसारखा नेता मुख्यमंत्री झाला तर राज्याला फायदा होईलं असं वक्तव्य केलं.

पाहा व्हिडीओ -

तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde) अयोध्या दौऱ्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर देखील भाष्य केलं. रोहित पवार म्हणाले, अयोध्या दौरा केला पाहिजे मात्र, धर्माचं राजकारण करू नये शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा देखील केला पाहीजे त्याबरोबर शेतकऱ्यांना मदत देखील करायला पाहिजे असं ते म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदेच्या बंडानंतर राज्यातील सरकार कोसळलं आणि राष्ट्रवादी हा राज्यातील दोन नंबरचा मोठा पक्ष ठरला आहे. तेव्हापासून राष्ट्रवादीच्या गोटातून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे. तर महाविकास आघाडी सरकार असताना देखील राष्ट्रवादीमधून पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केली जात होती.

Ajit Pawar, Rohit Pawar
'आमदार सांभाळणं सोप्प नाही; दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकार उलटणार'

अशातच आता पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते दत्ता भरणे यांनी देखील येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल असा पुनरुच्चार केला आहे.

अजितदादा भावी मुख्यमंत्री -

दरम्यान आज बारामती येथे एका कार्यकर्त्याने अजित पवारांना अनोख्या शुभेच्छा दिल्या त्याने अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेला एक फलक झळकवला. जनार्दन ड्रायव्हर नावाच्या कार्यकर्त्याने हा फलक झळकवला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या मनातील अजितदादांना मुख्यमंत्री करण्याची मनातील इच्छा उघड झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com