पुणे : काही दिवसाअगोदर इगतपुरी कसारा रेल्वे स्थानक दरम्यान पुष्पक एक्स्प्रेसवर ८ जणांनी दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाइल, रोकड आणि दागिने असा ऐवज लुटला होता. दरोडा टाकल्यानंतर आरोपींनी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला होता.
ही घटना ताजी असतानाच, रेल्वे लुटीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. यावेळी आरोपींनी रेल्वे रोखण्याकरिता चक्क सिग्नलच्या वायरी तोडून कोणार्क एक्स्प्रेसवर दरोडा टाकला आहे. दरोडेखोरांनी सिग्नलच्या वायरी तोडून रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात घातला आहे. चोरट्यांनी खिडकीत बसलेल्या २ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्या आहेत.
हे देखील पहा-
ही घटना पुणे दौंड रेल्वेमार्गावरील नानविज फाट्याजवळ घडली आहे. रेल्वे सिग्नलच्या वायरी कापल्याने सिग्नल न मिळाल्यामुळे रेल्वे नानविज फाट्याजवळ थांबली होती. दरम्यान अंधारातून आलेल्या ३ दरोडेखोरांनी २ महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी हिसकावली पळवली आहे.
दरम्यान बहिणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याने चोरट्यांचा पाठलाग करण्याकरिता रेल्वेतून खाली उतरलेला तरुण चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झाला आहे. विनायक श्रीराम असे चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्री साडेसात वाजता कोणार्क एक्स्प्रेस पुण्याहून दौंडकडे रवाना झाली होती.
रात्रीच्या पावणे नऊच्या सुमारास कोणार्क एक्स्प्रेस नानविज फाट्याजवळ पोहोचली होती. पुढे मार्गक्रमण करण्याकरिता सिग्नल न मिळाल्याने कोणार्क एक्स्प्रेस नानविज फाट्यावरच थांबुन राहिली. यावेळी अंधारातून आलेल्या ३ दरोडेखोरांनी एस-४ आणि एस-१ बोगीमध्ये खिडकीत बसलेल्या २ महिलांच्या गळ्यातील एकूण ११ तोळे सोनं भामट्यांनी हिसकून आणि अंधारातून पळ काढला आहे.
यावेळी बहिणीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावल्याने रेल्वेतून खाली उतरलेल्या एका तरुणाला चोरट्यांनी रेल्वे रुळावरील दगडांच्या साह्याने जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी लोह मार्ग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.