Auto Rickshaw Strike Pune: पुण्यात रिक्षा संघटना उद्यापासून बेमुदत संपावर जाणार; 'हे' आहे कारण

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात 'बघतोय रिक्षावाला संघटने'ने बेमुदत बंद पुकारला आहे.
auto rickshaw file photo
auto rickshaw file photo saam tv
Published On

Auto Rickshaw Strike Pune : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांसाठी मोठं वृत्त समोर आलं आहे. रिक्षामधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात 'बघतोय रिक्षावाला संघटने'ने बेमुदत बंद पुकारला आहे. यामुळे रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

auto rickshaw file photo
Pune Half Marathon 2022: लहानग्यांपासून ते आजोबा-आजीपर्यंत सर्वजण मनसोक्त धावले; पाहा पुणे मॅरेथॉनमधील विजेत्यांची नावं

बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात 'बघतोय रिक्षावाला संघटने'ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 'बघतोय रिक्षावाला संघटने'ने बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे उद्यापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो रिक्षा वाहतूक व्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. बघतोय रिक्षावाला (Auto Rickshaw) संघटनेने पुकारलेल्या बेमुदत बंदला इतर १२ ऑटो रिक्षा संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

auto rickshaw file photo
Pune MNS : मनसेत अंतर्गत वाद; वसंत मोरे पुन्हा नाराज असल्याची चर्चा, स्वत: सांगितलं कारण...

ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सीमुळे रिक्षावाल्याचा ९० % व्यवसाय बुडत असल्याचा दावा रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सीच्य विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. आम्ही ओला, उबेर आणि रॅपिडो कंपन्यांच्या बाईक टॅक्सी बंद झाल्याशिवाय संप व मागे घेणार नाही, असा इशारा बघतोय रिक्षावाला संघटनेने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com