पुण्यात नवे निर्बंध? पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक

सतत वाढणारा आकडा पाहता पालकमंत्री आज काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
Ajit Pawar
Ajit PawarSaam Tv
Published On

पुणे - जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) झपाट्याने प्रसार होत आहे. जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा काल  50 हजारांच्या घरात पोचला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत आज दुपारी 4.15 वाजता कोरोना आढावा बैठक होणार आहे. आठवड्यात किंवा 2 आठवड्यात पालकमंत्री विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेत असतात, सध्या राज्याने घालून दिलेले सर्व निर्बंध पुणे जिल्ह्यात लागू आहे. सतत वाढणारा आकडा पाहता पालकमंत्री आज काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. (Ajit Pawar Latest News)

हे देखील पहा -

दरम्यान, तिसऱ्या लाटेत देखील मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) हे कोरोना हॉटस्पॉट ठरत आहेत. गेल्या २४ तासात पुण्यात ५ हजार ४८० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर गेल्या २४ तासात २ हजार ६७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन जण पुण्याबाहेरील आहे. शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्ण संख्या २८ हजार ५४२ इतकी आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com