भितीपोटी ‘प्रवेशपत्र’च काढून घेतले?

लोहमार्ग पोलीस भरतीतील प्रकार; ‘न्यासा’कडेच कंत्राट
भितीपोटी ‘प्रवेशपत्र’च काढून घेतले?
भितीपोटी ‘प्रवेशपत्र’च काढून घेतले?Saam Tv
Published On

पुणे - पुणे लोहमार्ग जिल्ह्यासाठी पोलीस शिपाई भरती २०१९ची लेखी परीक्षा १७ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. आता या परीक्षेतील गैरव्यवस्थापनाचे किस्से बाहेर येण्यास सुरवात झाली आहे. लेखी परीक्षा संपल्यानंतर उत्तर पत्रिकेच्या कार्बन कॉपीसोबतच प्रश्नपत्रिका देणे अपेक्षीत असताना, मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारांकडून प्रश्नपत्रिका काढून घेण्यात आल्या, तर काही ठिकाणी चक्क प्रवेशपत्रच काढून घेतल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या परीक्षेचे कंत्राटही न्यासा कम्यूनिकेशन्सला देण्यात आले होते.

पुणे शहर, ग्रामिण, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर अशा आठ ठिकाणी एकूण ७७ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी सुमारे ७२ हजार उमेदवारांनी राज्यभरातून अर्ज केले होते. या परीक्षेत उमेदवारांच्या तक्रारी समोर येत येत आहेत. पाहणीतील गैरव्यवस्थापनाला आता पुष्टी मिळत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील गट क आणि गट डची लेखी परीक्षा न्यासाच्या अशाच बेजबाबदार कारभारामुळे पुढे ढकलावी लागली होती. प्रवेशपत्र आणि उत्तरपत्रिकेतील चुकांबरोबर परीक्षेतील गैरव्यवस्थापनावर पडदा टाकण्यासाठी प्रवेशपत्र काढून घेतल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.

हे देखील पहा -

परीक्षा केंद्रावरील गैरव्यवस्था -

- विद्यार्थ्यांना बॅगा ठेवण्यासाठी व्यवस्था नाही

- अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिका काढून घेतल्या, तर काही ठिकाणी प्रवेशपत्र

- अपात्र अथवा अकुशल पर्यवेक्षकांच्या नेमणुका

- महिला उमेदवारांची तपासणीसाठी स्वतंत्र कक्षाचा अभाव

- उमेदवारांच्या तपासणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव

- अनेक केंद्रांवर तपासणीसाठी न्यासाचे कर्मचारी नाही

लोहमार्ग पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त-

परीक्षा केंद्रांवर लोहमार्ग पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवल्याचे पाहायला मिळाले. केंद्रावरील विद्यार्थी संख्येनुसार ८ ते १९ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. तपासणी खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी करायची अपेक्षीत असताना, ही तपासणी पोलिसांनी केल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले. बहुतेक केंद्रांवर पोलिसांकडून व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून पोलीस शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत सुमारे ७५० हून अधिक कर्मचारी या ठिकाणी बंदोबस्ताला होते.

भितीपोटी ‘प्रवेशपत्र’च काढून घेतले?
Nagpur : पोलीस गेले एका गुन्ह्याचा तपास करायला, उघडकीस आले ३ गुन्हे!

उत्तरतालीका कशी तपासणार ?

प्रश्नपत्रिका काढून घेतल्यामुळे विभागाच्या वतीने घोषित प्राथमिक उत्तरतालीका कशी पडताळणार असा प्रश्न आता उमेदवारांसमोर आहे. प्रश्नपत्रिकाच उपलब्ध नसल्यामुळे उत्तरांवर अथवा चुकीच्या प्रश्नांवर कसा आक्षेप घेता येईल, असा प्रश्न उमेदवारांनी उपस्थित केला आहे. न्यासाच्या अधिकाऱ्यांशी बोलले असता त्यांनी ‘डिपार्टमेंटच्या आदेशाने आम्ही हे केल्याचे म्हटले आहे.

उमेदवारांसाठी लोहमार्ग पोलिसांच्या संकेतस्थळावर प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. रेल्वे पोलिस विभागाच्या आदेशान्वये उमेदवारांचे प्रवेशपत्र सर्वच ठिकाणांहून जमा करण्यात आले आहेत. आमचे कर्मचारी सर्व ठिकाणी उपस्थित होते अशी माहितीन्यासा कम्युनिकेशनचे उपाध्यक्ष अनिल भट यांच्याकडून देण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com