निवृत्ती बाबर
26/11 Mumbai Attack: आजही मुंबईमधील नागरिकांसाठी २६/११ हा दिवस काळी रात्र होऊन उभा आहे. या घटनेला आता १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र तरी देखील आजही ही तारीख जरी कानावर पडली तरी अंगावर शहारे उभे राहतात. या घटनेवर आधारित चित्रपट देखील काढण्यात आला आहे. अशात आता मुंबईतील नरिमन लाईट हाऊस येथील 26/11 चा चित्तथरारक अनुभव पर्यटकांना अनुभवता येणार आहेत. (Latest 26/11 Tour at Nariman Lighthouse News)
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 26/11 चा हल्ला प्रत्यक्षात घटना स्थळी लोकांना पाहता येणार आहे. यासाठी मेमोरियल म्युझियम तयार करण्यात आले आहे. हल्ला कसा झाला याविषयी यात माहिती दिली जाणार आहे. कोरोना अगोदर काही ठराविक वेळेत लोकांना या अनुभवण्यासाठी वॉक सुरु करण्यात आलं होतं. परंतु कोरोनामुळे नंतर ते बंद करण्यात आलं.
कोण दाखवणार हा चित्तथरारक अनुभव?
खाकी टूर्सच्या माध्यमातून पर्यटक आणि मुंबईकरांना नरिमन लाईट हाऊस येथील 26/11 चा अनुभव घेता येणार आहे. कोरोना काळात हे सर्व काही बंद केल्यानंतर आता पुन्हा एकदा पर्यटकांसाठी हा अनुभव सुरू करण्यात येत आहे. दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6.30 पर्यंत हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले करण्यात येईल.
यासाठी बुक माय शो तसेच खाकी टूर्सच्या ऍपच्या माध्यमातून बुकिंग करता येईल. आज पत्रकार परिषद घेऊन या बाबत अधिक माहिती दिली जाणार आहे. नरिमन हाऊसच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर झालेल्या या दहशदवादी हल्ल्याबाबत जाणून घेण्यासाठी आणि सर्व मृत आणि शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी मेमोरियल म्युझियम तयार करण्यात आलं आहे.
नरिमन लाईट हाऊस या ठिकाणी दोन दहशतवादी एके 47 रायफलसह घुसले होते. त्यांनी अनेक निरपराधांचे प्राण घेतले होते. दहशतवादी हल्ल्याच्या खुणा, ठसे आजही इथे पाहायला मिळतात. दहशतवादी हल्ल्यामध्ये 166 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनांच्या खाणाखूणा आजही तेथे तशाच आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.