शंभर वर्षाच्या इतिहासात राज्यात ऊसाचं विक्रमी उत्पादन, देशात पटकावलं अव्वल स्थान

साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले दर, राज्यात कारखान्यांची वाढलेली कपॅसिटी अशी अनेक कारणं या ऊस उत्पादन वाढीसाठी निर्णायक ठरली आहेत.
Sugar Cane
Sugar CaneSaam TV
Published On

प्राची कुलकर्णी -

पुणे : महाराष्ट्र राज्य हे शेती संपन्न राज्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आणि यावेळेस कारण ठरल आहे ते राज्यात यंदा झालेलं विक्रमी ऊस उत्पन्न. यावर्षी ऊसाच्या उत्पादनात महाराष्ट्र देशात पहिल्या तर जगात तिसऱ्या स्थानी आले आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याने सगळ्या जगाला चकित केलं आहे.

इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी उत्पन्न

राज्यात यंदा ऊसाचं (Sugar Cane) विक्रमी उत्पादन झालं असून ऊसाच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्याने देशात पहिल्या तर जगात तिसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आहे. साखर कारखाने सुरू झाल्यापासून शंभर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पन्न आल आहे. यावर्षीच्या हंगामात राज्यात तब्बल 111 लाख टन इतक्या उसाच उत्पन्न झाल आहे.

'या' कारणांमुळे राज्यात ऐतिहासिक ऊस उत्पादन -

राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादनाची ही पहिलीच वेळ आहे. या ऊस उत्पादनामागे अनेक कारण असल्याची माहिती समोर येत आहे. ब्राझील मध्ये पडलेला दुष्काळ तसेच भारताने साखरेचे उत्पन्न (Sugar Yield) कमी करत इथेनॉलकडे वळण्याचा घेतलेला निर्णय. त्याचबरोबर साखरेचे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले दर, राज्यात कारखान्यांची वाढलेली कपॅसिटी अशी अनेक कारणं या ऊस उत्पादन वाढीसाठी निर्णायक ठरली आहेत. साखर उत्पादनात एक नंबरला ब्राझील दोन नंबरला युरोपियन युनियन तर तीन नंबरला महाराष्ट्राचा क्रमांक लागला आहे.

साखर आयुक्तालयाकडून साखर कारखान्यांचं रँकिंग

Sugar Cane
शरद पवार, परबांमुळे ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, कोर्ट म्हणाले त्यांच्यावर गुन्हा दाखल करा - सदावर्ते

या सगळ्या बरोबरच राज्यातील साखर आयुक्तालयाने राज्यात असणाऱ्या साखर कारखान्यांच एक रँकिंग केल आहे. ही रँकिंग करतच साखर आयुक्तालयाने कारखान्याची एक लिस्ट पब्लिक डोमेन मध्ये प्रसारित केली आहे. आणि या सगळ्या कारणांमुळे शेतकऱ्यांना आपला ऊस जाईल असा विश्वास पटला आहे.

सद्यस्थितीला राज्यातले 197 साखर कारखाने सुरू

सद्यस्थितीचा विचार केला असता राज्यातील एकूण 197 साखर कारखाने (Sugar factory) सुरू असून,त्यामध्ये 98 खाजगी 97 सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. हंगाम संपायला अजून दीड महिन्याचा अवधी असल्याने. उसाचे उत्पन्न आणखीन वाढण्याची शक्यता आहे उत्पन्न 125 लाख टनापर्यंत जाईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. हा गेल्या शंभर वर्षातील रेकॉर्ड असल्याच सांगतच भारतातून होणाऱ्या साखरेच्या निर्यातीत 90 टक्के वाटा हा महाराष्ट्राचा असेल अशी माहिती देखील राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com