Mumbai; ६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची उधळपट्टी?

एमएमआरडीए कडून आगामी काळात मुंबईत महत्वाचे आणि मोठे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत.
Mumbai; ६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची उधळपट्टी?
Mumbai; ६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची उधळपट्टी?Saam Tv
Published On

मुंबई : एमएमआरडीए कडून आगामी काळात मुंबईत महत्वाचे आणि मोठे अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांसाठी (projects) होणारा खर्च १,७४,९४० कोटींमध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पांच्या उभारणीसाठी एमएमआरडीएला (MMRDA) कोट्यवधीं रुपयांचे कर्ज आगामी काळात घावा लागणार आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी एमएमआरडीएने एक सल्लागार कंपनी नियुक्त केली आहे. या कंपनीला तब्बल १२० कोटी रुपये एमएमआरडीए कडून दिले जाणार आहेत .

वर्ल्ड बँक, जपानी जायका, एशियन डेव्हल्पमेंट, एनडीबी (NDB) अश्या अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांकडून एमएमआरडीएने कर्ज याअगोदर घेतले आहे. भविष्यामध्ये आणखी ६० हजार १२४ कोटी रुपयांच कर्ज एमएमआरडीएला घ्यावं लागणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने 'एसबीआय कॅपिटल मार्केट लि.' नावाच्या कंपनीला कर्ज उभारण्यासाठी 'व्यवहार व प्रकल्प सल्लागार' म्हणून नियुक्त केले आहे.

हे देखील पहा-

ही कंपनी वेगवेगळ्या अर्थ पूरवठादारांकडून कर्ज उपलब्ध करून देणार आहे. एकूण कर्जाच्या ०.२ टक्के शुल्क या कंपनीला (company) दिले जाणार आहेत. त्यामुळे एमएमआरडीएला ६०,१२४ कोटी रुपयांचं कर्ज लागणार आहे. त्यातील ०.२ टक्के म्हणजेच सरासरी १२० कोटींच्या घरात रक्कम त्यासाठी या कंपनीला एमएमआरडीए देणार आहे. अर्थपुरवठा करणाऱ्या अनेक संंस्था तयार असताना देखील तब्बल १२० कोटी रुपये एसबीआय (SBI) कॅपिटल मार्केट लि. यांची नियुक्ती केल्यामुळे पैश्यांनी ही उधळपट्टी असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai; ६० हजार कोटींच्या कर्जासाठी १२० कोटींची उधळपट्टी?
टीईटी परीक्षा प्रकरण; राज्य परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपेंना अटक

एमएमआरडीएचे प्रकल्प आणि अपेक्षित खर्च

एमएमआरडीएचे सध्या मेट्रो, शिवडी- न्हाव- शेवा सी- लिंकसाठी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील भुयारी मार्ग, उड्डाणपुलांंच्या विकास प्रकल्प असे निर्माणाधिन प्रकल्प आहेत. या सगळ्या प्रकल्पांची मिळून १,७४,९४० कोटींची कामे एमएमआरडीएकडे आहेत . यापैकी २०२०- २१ मध्ये ३२,००० कोटी रुपये एमएमआरडीएने खर्च केले आहेत. मेट्रो आणि शिवडी- न्हाव- शेवा सी- लिंकसाठी ४२,६४७ कोटी रुपयांचे कर्ज (Debt) सध्या मंजूर झाले आहे. तर उर्वरित प्रकल्पांसाठी येत्या ५ वर्षांत आणखी १,०५,४३४ कोटींची गरज लागणार आहे.

सध्या एमएमआरडीएकडे ४९,००० कोटींची जमीन आणि मुंबई (Mumbai) महानगर प्रदेशातील वेगवेगळ्या महापालिकांना (Municipal Corporation) दिलेल्या कर्जाच्या व्याजामधून ७७,०४३ कोटींचे उत्पन्न प्राधिकरणाला अपेक्षित आहे. त्याचबरोबर सी-लिंक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील भुयारी मार्ग, उर्वरित मेट्रो प्रकल्पांसाठी ६०,१२४ कोटींची एमएमआरडीएला गरज आहे. आणि हेच कर्ज मिळवून देण्यासाठी एमएमआरडीएने एसबीआय कॅपिटल मार्केट लि. या कंपनीची नियुक्ती केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com