मुंबई: महापुरुषांच्या चरित्र साधने समित्यांनी अतिशय वेगवान पद्धतीने काम करावे असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले. तसेच महापुरुषांच्या चरित्र वाचनातुन उद्याची सक्षम पिढी घडेल असही सामंत यावेळी म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती यांची स्वतंत्र बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.Reading the characters of great men will lead to a capable generation of tomorrow - Uday Samant
राज्य शासनाने विविध चरित्र साधने समित्यांचे पुनर्गठन केल्यानंतर शासनाने संबंधित समित्यांच्या बैठकांचे आयोजन केले. या बैठकांमध्ये समितीमार्फत आजवर झालेल्या कामांचा अहवाल मांडला. तसेच येत्या वर्षभरामध्ये हाती घ्यावयाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
आंबेडकरांच्या सहाव्या खंडाचे प्रकाशन लवकरातच
डॉ.बाबासाहेब आंबेडकरDr.B.R Ambedkar चरित्र साधने प्रकाशनातील सहाव्या खंडाचे प्रकाशन लवकरच करून ते लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच सध्या बाजारात उपलब्ध नसलेले आणि लोकांची मागणी असलेले सर्व खंड तातडीने आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जावेत अशा सूचना संबंधितांना करून यासाठी निधीची कसलीही कमतरता पडू दिली जाणार नाही असं आश्वासनही उदय सामंतानी दिलं.
तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेAnnabhau Sathe यांचे चरित्र खंड ३ आणि खंड ४ चे नवीन प्रकाशन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून खंड १ आणि २ चे पुनर्मुद्रण करावे अशा प्रकारची सूचना संबंधितांना केली आहे. तर लोकमान्य टिळकLokmanya Tilak यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या साहित्याची निर्मिती करून सध्या टिळकांच्या वंशजांकडे उपलब्ध असलेल्या साधनांचे प्रकाशन करावे असे निर्देश श्री.सामंत यांनी यावेळी दिले. तसेच अशा प्रकारचे सर्व साहित्य मुंबईतील अभिलेखांगारांमध्ये उपलब्ध असेल त्यासाठी गृह विभागाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या शासन तातडीने घेऊन देईल तसेच कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्यातील महाविद्यालयांत महापुरूषांच्या नावाने अभ्यासमंडळे स्थापन केली असल्याचेही, श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
सर्व साधने ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध
सर्व चरित्र साधने प्रकाशन समित्यांची प्रकाशने ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील. सर्व पुस्तकांना आयएसबीएन क्रमांक मिळण्यासाठी आणि सर्व समित्यांची ऑनलाईन पोर्टल तयार करण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत. तसेच हे साहित्य ऑनलाईन स्वरूपात अधिक सुलभ पद्धतीने सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याही सामंत म्हणाले.
या बैठकीस डॉ.दीपक टिळक, डॉ.भालचंद्र मुणगेकर, प्रा.राजा दीक्षित,डॉ.प्रकाश बचाव, प्रा.अरविंद गणाचारी, प्रा.बळीराम गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव मल्लिका अमर शेख, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव डॉ.श्रद्धा कुंभोजकर उपस्थित होते.
Edited By- Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.