ज्ञानेश्वर हिंगोलीकर
पुणे: पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा (shivajirao bhosale cooperative bank) परवाना आरबीआयने रद्द केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) तत्काळ आदेश काढत हा या बॅंकेचा परवाना रद्द केला आहे. सहकार विभागाने केलेली शिफारस, पुरेसं भांडवल आणि उत्पन्नाचे आटलेले स्त्रोत यांसह विविध आर्थिक अनियमितांवर बोट ठेवत आरबीआयने ही कारवाई केली आहे. या बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला असला, तरी बँकेतील ९८ टक्के ठेवीदारांना त्यांची व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे. हे पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदारांना केवायसी प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रांसह आपला दावा सादर करावा लागणार आहे. (RBI cancels the licence of Shivajirao Bhosale Sahakari Bank, Pune)
हे देखील पाहा -
आरबीआयचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक अनियमिततेसह अन्य कारणांवरून या बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँक लिक्विडेशनमध्ये काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली आहे. विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या बँकेच्या ९८ टक्के ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २८ मे २०२१ ला या बॅंकेचा परवाना रद्द केला होता. ३१ मे पासून बँकेला आपले व्यवहार बंद करण्याचे आदेश आरबीआयने दिले होते. बँकेतून ठेवीदारांना 5 लाखा पर्यंतच्या ठेवी काढता येणार आहेत. रिझर्व बँकेनं त्यासाठी आधीच मान्यता दिलेली आहे. संबंधित ठेवीदारांनं ठेवी परत मिळण्याबाबतचा अर्ज बँकेच्या शाखेत करणं आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.