
मुंबई: संजय राऊतांनी सगळं सोडलं पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाहीत अशी बोचरी टीका शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केली आहे. गुवाहाटीतील हॉटेल ब्ल्यू रेडिसन येथे बंडखोर आमदारांच्या समोर भाषण करताना ते बोलत होते. "गुलाबराव पाटील हे आमदार होण्याआधी पानटपरी चालवायचे त्यानंतर ते कॅबिनेट मंत्री झाले मात्र ते आता पुन्हा पानटपरीवर बसतील," अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती, यावर प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. (Gulabrao Patil Slams Sanjay Raut)
हे देखील पाहा -
याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्याबद्दल प्रेत काढून घेऊ, बाप किती, असं बोललं गेलं. आमच्या जीवनाचा संघर्ष बोलणाऱ्यांना माहित नाही, १९९२ च्या दंगलीत मी, दोन भाऊ आणि माझे वडील तुरुंगात होतो, तेव्हा संजय राऊत कुठे होते? ५६, ३०२ काय असते हे संजय राऊतांना माहिती नाही, रस्त्यावर पायी चालणं काय असतं राऊतांना माहित नाही, ते आम्ही भोगलं आहे, हे फक्त बाळासाहेबांचा फोटो लावून मोठे झालेलं चित्र. आपण बाळासाहेंबांच्या विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते आहोत. सभागृहात डिबेटमध्ये आपण ३९ आणि ११-१२ अपक्ष हे त्यांच्यासाठी पुरेसे आहोत. राऊतांनी त्यांनी वर्षा सोडली, त्यांनी आमदारांना सोडलं, पण ते शरद पवारांना सोडायला तयार नाही असा टोला लगावत आम्ही त्यांच्यासाठी काहीच केलं नाही का?, असा प्रश्न यावेळी गुलाबराव पाटलांनी केला आहे.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, तथा जळगावचे पालकमंत्री आणि शिवसेना उपनेते व प्रवक्ता असलेले गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे गटाला मिळाळ्याने त्याच्याकडून ही खाती ठाकरे सरकारने काढून घेतली आहेत. संजय राऊतांनी गुलाबराव पाटील यांच्यावर बोचरी टीका केल्यानंतर राऊतांनाही तसंच प्रत्युत्तर मिळालं आहे. पाटील म्हणाले की, आमची परिस्थिती नसतानाही आम्ही त्यांच्यासाठी (उद्धव ठाकरेंसाठी) भरपूर केलं, हे जे मिळालं, आहे निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने मिळालंय, पण आमचाही त्यात त्याग आहे. आम्ही आमच्या घरी तुळशी पत्र ठेवून काम केलेलं आहे, आम्ही आयत्या बिळावर नागोबावाले नाहीत. संजय राऊत सांगतात टपरीवर पुन्हा पाठवू, चूना कसा मारतात हे त्यांना माहित नाही अजून, जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही संजय राऊतांनी चुना लावू असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.
Edited By - Akshay Baisane
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.