पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

पहिली ते चौथी सर्व विद्यार्थ्यांना शाळा आले पाहिजेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा प्रस्ताव आहे की, शाळा सुरु करण्यात याव्यात.
पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहितीSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई: पहिली ते चौथी सर्व विद्यार्थ्यांना शाळा आले पाहिजेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा प्रस्ताव आहे की, शाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच आरोग्य विभागाने देखील आता संमती दिलेली आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. उद्या मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल, असही राजेश टोपे म्हणाले.

लहान मुलांचे लसीकरण केले पाहिजे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दा मांडला आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु करायला परवानगी द्यावी. त्यामुळे उद्या कॅबिनेट आहे, अंतिम निर्णय उद्या होतील आणि लवकरच मुख्यमंत्री स्तरावर याबद्दल निर्णय होईल असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.

नाट्यगृह, सिनेमगृह बाबत सुधारणा झाली तर;

पुढे त्यांनी नाट्यगृह, सिनेमगृह सुरु करण्याबद्दल सांगितलं, आज 50% परवानगी दिली आहे. जर येत्या काळात चांगली सुधारणा झाली तर सकारात्मक निर्णय होईल. तर हे निर्बंध देखील कमी करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी सांगितलं.

पहिली ते सातवीचे वर्ग सुरु होणार? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
Jersey Trailer : 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; शाहिद म्हणाला...

पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेवावा;

महाराष्ट्रात आता ७०० ते ८०० रुग्ण सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. मुले आजारी पडल्याचं प्रमाण जास्त नाही. पालकांनी चिंता करण्याचं कारण नाही. तर पाचवी पासून पुढील वर्ग सुरु आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत त्यामुळे, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु करावेत यासाठी शालेय शिक्षण विभागाचा प्रस्ताव आहे.

उद्याच्या कॅबिनेट बैठकीला उपस्थित असणार मुख्यमंत्री;

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानेच्या दुखण्यामुळे त्रस्त होते त्यामुळे त्यांची नुकतीच सर्जरी पार पडली. याबद्दल राजेश टोपे यांनी सांगितलं की, यांची तब्येत चांगली आहे. फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांची तब्येत चांगली असल्याने कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. तर उद्या ते व्हिडीओ कॉलद्वारे बैठकीत उपलब्ध असतील अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com