Raj Thackeray News: ...तर बरं झालं असतं, नवीन संसदभवनाच्या लोकार्पणानंतर राज ठाकरेंचं ट्वीट'

Raj Thackeray on New Parliament Building Inauguration : बहुतेक विरोधीपक्षांनी या वादामुळे आजच्या ऐतिहासिक अशा उद्घाटन सोहळ्याला दांडी मारली.
Raj Thackeray
Raj Thackeray Saam TV
Published On

New Parliament Building Inauguration : नव्या संसद भवनानाच्या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा आज पार पडला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते नव्या संसदेचं लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

बहुतेक विरोधीपक्षांनी या वादामुळे आजच्या ऐतिहासिक अशा उद्घाटन सोहळ्याला दांडी मारली. अनेक बड्या नेत्यांना यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की,

'आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.'

Raj Thackeray
PM Narendra Modi Speech: नव्या संसदेत पहिले भाषण! काय म्हणाले PM मोदी? वाचा महत्वाचे १० मुद्दे...

विरोधकांनी बहिष्कार का टाकला?

नवीन संसद भवनच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. देशभरातील 20 पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

विरोधी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन झाल्यानंतर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ऐतिहासिक कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आले. हे भाजप आणि आरएसएसची दलीत, आदिवासी आणि मागास समाजाविरोधातील वृत्ती दाखवते.', अशी टीका विरोधकांनी केली आहे.

Raj Thackeray
New Parliament Building : नागपुरी सागवानापासून ते राजस्थानच्या लाल खडकापर्यंत, देशाच्या विविधतेने नटले आहे नवीन संसद भवन

विविधतेने नटले आहे संसद भवन

देशातील लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर असलेलं नवं संसद भवन देशाचा लौकिक वाढवणार यात शंका नाही. परंतु त्याहून विशेष म्हणजे या संसद भवनाच्या उभारणीसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळे साहित्य गोळा करण्यात आले. हे संसद भवन देशातील विविधतेचे प्रतिक आहे. देशभरातील विविध क्षेत्रांतून मिळवलेले यूनिक साहित्य वापरून ही वास्तू उभारण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com