Raj Thackeray News: राज ठाकरेंविरोधात दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट

राज ठाकरेंविरोधात या आठवडाभरात दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट काढलं असल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray non bailable warrant, Raj Thackeray latest Marathi News, MNS News
Raj Thackeray non bailable warrant, Raj Thackeray latest Marathi News, MNS NewsSAAM TV
Published On

मुंबई: औरंगाबादमधील सभेनंतर गुन्हा दाखल झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. बीडमधील परळी न्यायालयानं आता राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं आहे. गृहमंत्रालयातील सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. यापूर्वी सांगली न्यायालयानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. (Raj Thackeray latest Marathi News)

Raj Thackeray non bailable warrant, Raj Thackeray latest Marathi News, MNS News
Raj Thackeray Latest Update: राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. २००८ मधील खटल्यानंतर आता परळी न्यायालयानंही राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज ठाकरेंविरोधात गेल्या आठवडाभरातील दुसरं अजामीनपात्र वॉरंट आहे. सांगली (Sangli) न्यायालयानं देखील त्यांच्याविरोधात २००८ मधील प्रकरणात वॉरंट बजावलं होतं. या प्रकरणात राज यांच्याविरोधात भादंवि कलम १४३, १०९, ११७ आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राज ठाकरेंविरोधात हायकोर्टात याचिका

राज ठाकरे यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी ही याचिका गुरुवारी दाखल केली आहे. राज्यभरात सध्या भोंग्यांचा मुद्दा तापला असून, राज्यभरात ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा भोंग्यावर वाजवली आहे. तसंच चिथावणीखोर वक्तव्य करून राज्यातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे. राज ठाकरेंविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

शिराळा न्यायालयानेही काढलं वॉरंट

२००८मधील प्रकरणात राज ठाकरेंविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयात तारखेला हजर न झाल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट काढलं होतं. २००८मध्ये राज यांना कल्याणमध्ये अटक झाली होती. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनीही शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथे आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती. या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com