
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे त्यांचे निस्सीम चाहते कधी काय मागणी करतील? याचा काही नेम नाही. असाच अनुभव राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आज पुणे (Pune) दौऱ्यात आला. परभणीचे निशांत आणि विशाखा कमळू (Nishant Kamaloo, MNS) हे दाम्पत्य त्यांच्या चार वर्षांच्या चिमुरड्याचं नाव राज यांच्याकडूनच ठेवण्यासाठी थेट राज ठाकरे बैठक घेत असलेल्या केसरी वाड्यात पोहोचले. बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज यांना गाठून चिमुरड्याला नाव (Naming ceremony) देण्याची विनंती केली. या मागणीने राजही काही क्षण बुचकळ्यात पडले. पण मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला 'यश' (Yash) हे नाव दिलं. निशांत हे गेली चौदा वर्षे राज यांचे निस्सीम चाहते तर आहेतच, शिवाय मनसेचे (MNS) पदाधिकारीही आहेत. (raj thackeray did naming ceremony. see what has relation this kid with raj thackeray)
हे देखील पहा -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपल्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरुन प्रेम मिळतं. खासकरुन लहान मुलं राज ठाकरेंना फार आवडतात. यापुर्वीही पुण्यातील एका दौऱ्यात एका लहान मुलानं राज ठाकरेंचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धडपड केलेली बघताना राज ठाकरेंनी स्वतः त्या मुलाला आटोग्राफ दिला होता. विशेष म्हणजे सभोवताली गर्दी असल्याने वही ठेवण्यासाठी राज ठाकरेंनी मनसे नेते वसंत मोरे यांच्या पाठीवर वही ठेवत त्या मुलाला आटोग्राफ दिला होता. त्यामुळे राज ठाकरे एका नेत्याच्या पलीकडे चिमुकल्यांचेही लाडके आणि आपल्या चिमुकल्या चाहत्यांना न दुखवणारे असे नेते आहेत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.