'तुमचं अजूनही लग्न नाही झालं'; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राज ठाकरेंनी घेतला समाचार

संजय राऊतांवरती टीका करत राज यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांची केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.
Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV
Published On

प्राची कुलकर्णी -

पुणे : दरवर्षी मुंबईत होणारा मनसेचा (MNS) वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे घेण्यात आला होता. आज मनसेला 16 सोळा वर्षे पूर्ण झाली असून या कार्यक्रमात राज ठाकरेंनी (Raj thackeray) आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केलं यावेळी त्यांनी अनेक नेत्यांचा समाचार घेतला.

संजय राऊतांवरती (Sanjay Raut) टीका करत राज यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांची केलेल्या त्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी यावळी राज्यपालांती नक्कल करत राज ठाकरे म्हणाले, त्यावेळी लग्न व्हायची अहो तेव्हा व्हायची लग्न लहान वयामध्ये, तुमचं अजून नाही झालं. सालं नको तिथं बोटं घालायची सवय यांना, असे म्हणत राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार घेतला तसंच राज्यपाल (BhagatSingh Koshyari) काहीही बरळतात असही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chatrapati Shivaji mahraj) केलेल्या वक्तव्याचा देखील त्यांनी या भाषणात समाचार घेतला. ते म्हणाले, हे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष तुम्हाला जातीत गुंतवून ठेवत आहेत. पहिल्यांदा जेव्हा भेटायला गेलो तेव्हा वाटलं की माझा हात बघायला लागतील की काय, तुम्हाला काही महापुरुषांबद्दल माहितीये का? आपला अभ्यास, संबंध नसताना नुसतं बोलून जायचं. काही समज आहे का, असा घणाघात त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवरती केला.

Raj Thackeray
कौतुकास्पद : शेतकऱ्याच्या मुलीची MPSC परीक्षेत बाजी; क्लास न लावता मिळवला प्रथम क्रमांक

दरम्यान, महापालिकेच्या निवडणूका लांबणीवर पडणार याबाबत आपण नोव्हेंबर 2021 मध्येच अंदाज बांधल्याचे त्यांनी सांगितलं अद्यापही निवडणुकांचे वातावरण जाणवत नव्हते. मात्र, निवडणूक लांबणीवर पडणार म्हणून राज्यात पेटवापेटवीचे वातावरण सुरु आहेत. मात्र निवडणूका पुढे जाण्याला मुख्यमंत्र्यांचे (Uddhav Thackeray) आजारपण कारणीभूत असल्याचे सांगत राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com