Raj Thackeray: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करुन निवडणूका पुढे ढकलण्याचा घाट

प्रशासक नेमून महापालिकांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न
Raj Thackeray: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करुन निवडणूका पुढे ढकलण्याचा घाट
Raj Thackeray: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर करुन निवडणूका पुढे ढकलण्याचा घाट Saam Tv
Published On

राज्यसरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घ्यायच्या नाहीत. ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा समोर करुन निवडणूका पुढे ढकलण्याचा घाट राज्यसरकारने (State Governement) घातला आहे. तसेच, प्रशासक नेमून महापालिकांवर वचक ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj Thackeray) यांनी केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हे देखील पहा-

दरम्यान, महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर मनसे तयारीला लागली आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. राज ठाकरे आज कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. 8 विधानसभा मतदारसंघातील शाखा अध्यक्ष व वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित आहेत. 2 महिन्यात राज ठाकरे यांचा 8 दौरा आहे. मनसे आता कोणाबरोबर जाणार हे पाहावं लागेल.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com