

Mumbai News : रेल्वे तिकिटासाठीची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तिकीट काढण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. UTS अॅप त्यापैकीच एक पर्याय आहे. मात्र या अॅपमुळे एका रेल्वे टीसीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तर मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात प्रवाशाला 26 हजारांचा दंड ठोठावला आहे.
नेमक घडलं काय?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 4 फेब्रुवारी 2020 रोजी टीसी जोसेफ पीटरप्पा आणि त्यांचे सहकारी सुनील कुरणे हे सीएसएमटी-पनवेल दरम्यान तिकीट तपासणी करत होते. त्यावेळी फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला त्यांनी तिकीटाची विचारणा केली. यूटीएस अॅपद्वारे काढलेल्या ट्रेनच्या तिकीटाचा मोबाईलमधील स्क्रीनशॉन त्या प्रवाशाने टीसींना दाखवला. मात्र हे तिकीट अवैध असल्याचं त्यांनी प्रवाशाला सांगितलं.
त्यानंतर टीसींनी प्रवाशाला सीवूड्स स्टेशनवर उतरवलं आणि दंड भरण्यास सांगितलं. मात्र तिकीट असून मी दंड का भरु असं प्रवाशाने विचारलं. यावरुन टीसी आणि या प्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद वाढल्यानंतर प्रवाशाने आक्रमक होत टीसीला मारहाण केली. त्यानंतर पीटरप्पा यांनी प्रवाशाविरोधात वाशी पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली.
या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने प्रवाशाला 21000 रुपयांचा दंड आणि पीटरप्पा यांना 5000 रुपयांची नुकसान भरपाई असा एकून 26000 हजारांचा दंड ठोठावला आहे. प्रवाशाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती. (Latest Marathi News)
त्याने यूटीएस अॅपवरुन मासिक पासही काढला होता. मात्र त्याच्या मोबाईलमध्ये हे अॅप नसल्याने त्याने पासचा फोटो जवळ ठेवला होता. यूटीएस अॅपवरील तिकीटाचा फोटो रेल्वे नियमानुसार वैध नाही. त्यामुळे वादाचे स्वरुप आणि गुन्ह्याच्या विचार करता प्रवाशाला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावणे हिताचे नसेल, असं सत्र न्यायालयाने म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.