Railway Decision: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांसाठी रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Railway Decision For Ganeshotsav: रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात आता नागरिकांना रात्रीदेखील लोकलने प्रवास करता येणार आहे. यासाठी रेल्वेने वेळापत्रक जारी केलं आहे.
Railway Mega Block
Railway Mega BlockX
Published On

रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेने गणेशोत्सवात विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण/ठाणे व परतीसाठी विशेष मध्यरात्री उपनगरी सेवा चालवण्यात येणार आहेत. या गाड्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण दरम्यान ४/०५.०९.२०२५(गुरुवार/शुक्रवार मध्यरात्री), ०५/०६.०९.२०२५ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्री) आणि ०६/०७.०९.२०२५(शनिवार/रविवार मध्यरात्री) रोजी धावतील.

Railway Mega Block
Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; ३६८ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

हार्बर मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या ६ आणि ७ सप्टेंबर रोजीगणपती विसर्जनाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि परतीच्या प्रवासासाठी धावतील. विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कल्याण/ठाणे/पनवेल दरम्यानच्या सर्व स्थानकांवर खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार थांबतील.

डाउन मेन मार्गीकेवर ६ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.४० वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०३.१० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –ठाणे विशेष सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.३० वाजता सुटेल आणि ठाणे येथे ०३.३० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–कल्याण विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०३.२५ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.५५ वाजता पोहोचेल.

अप मेन मार्गीकेवर (४, ५, ६ आणि सप्टेंबर रोजी)

कल्याण-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी कल्याण येथून ००:०५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०१:३० वाजता पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ठाणे येथून ०१:०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२:०० वाजता पोहोचेल.

ठाणे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी ठाणे येथून ०२:०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३:०० वाजता पोहोचेल.

Railway Mega Block
Old Railway Tickets Viral: 'आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात' रेल्वेच्या जाड पुठ्यांची तिकीटे पाहून तुम्हीही व्हाल भावूक

डाउन हार्बर मार्गावर (६ आणि ७ सप्टेंबर रोजी)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.३० वाजता सुटेल व पनवेल येथे ०२.५० वाजता पोहोचेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–पनवेल विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०२.४५ वाजता सुटेल व पनवेल येथे ०४.०५ वाजता पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर (०६ आणि ७ सप्टेंबर रोजी)

पनवेल–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी पनवेल येथून ०१.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०२.२० वाजता पोहोचेल.

पनवेल–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी पनवेल येथून ०१.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ०३.०५ वाजता पोहोचेल.

Railway Mega Block
Indian Railways : प्रवाशांना दिलासा! राजधानी-शताब्दी नव्हे तर आता इतर रेल्वेमध्येही मिळणार जेवण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com