Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुणे शहरात आज पाणीबाणी, कोण-कोणत्या भागात आज पाणी नाही?

Pune Water Crisis: पुण्यातील अनेक भागांमध्ये आज पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. फुटलेल्या जलवाहिनी दुरूस्तीच्या कामामुळे पुणेकरांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांनी पाणी जपून वापरावे.
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुणे शहरात आज पाणीबाणी, कोण-कोणत्या भागात आज पाणी नाही?
Pune Water IssueSaam Tv
Published On

पुण्यातील अनेक भागातील पाणी पुरवठा आज विस्कळीत होण्याची शक्यता आहे. वारजे येथे मुख्य जलवाहिनी फुटल्याने या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे शहरातल्या अनेक ठिकाणचा पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. यामुळे पुणेकरांनी आज पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

महापालिकेच्या मल:निस्सारण विभागाकडून वारजे येथे शनिवारी मलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम करण्यात येते होते. त्यावेळी खडकवासला ते वारजे दरम्यानची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्याप्रमाणात पाणी वाया गेले. शनिवारी रात्री फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सुरू केले आहे. हे काम रविवारी दुपारपर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे फेज क्रमांक २ ची जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे.

जलवाहिनीच्या दुरूस्तीच्या कामामुळे रविवारी दिवसभर वारजे, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, औंध, शिवाजीनगर, खडकी आणि कर्वेनगर या भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाणी जपून वापरा, पाण्याचा अतिवापर टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com