Pune: विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरात वाहतूक बदल, वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

Pune Traffic: विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आजपासून तात्पुरत्या वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरात वाहतूक बदल, वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरात वाहतूक बदल, वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहनGoogle
Published On

पुणे शहरातील विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आजपासून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

पुणे विमानतळ परिसरातील सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

मुख्य बदल:

न्यू एअरपोर्ट रस्त्यावर, पुणे विमानतळाकडून रामवाडीकडे जाणाऱ्या वाहनांना सिंबायोसिस विधी महाविद्यालय चौकामध्ये उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग:

वाहन चालकांनी दोराबजी मॉल चौकातून यू-टर्न घेऊन पुढे जावे. किंवा एअरपोर्ट चौकातून पेट्रोल साठा चौक मार्गे इच्छित स्थळी जाता येईल.

विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरात वाहतूक बदल, वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Mumbai Traffic : मुंबईत मोठी वाहतूक कोंडी, पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या ४ किमी पर्यंत रांगा

बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खालील बदल करण्यात आले आहेत:

1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी:

बाणेर पाषाण लिंक रस्त्याने विद्यापीठाकडे जाणारे वाहनचालक ४५ आयकॉन आयटी कंपनीसमोरून यू-टर्न घेऊन हॉटेल महाबळेश्वर चौकातून विद्यापीठ मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात.

2. बाणेर गावातून बाणेर पाषाण लिंक रस्त्याकडे जाण्यासाठी:

बाणेर गावातून बाणेर पाषाण लिंक रस्त्याकडे जाणारे वाहनचालक माऊली पेट्रोल पंपाकडून यू-टर्न घेऊन पुन्हा महाबळेश्वर हॉटेल चौकात येतील. तेथून डावीकडे वळून बाणेर पाषाण लिंकमार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात.

खराडी बायपास मार्गे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची माहिती:

बदल:

खराडी दर्गा चौकातून उजवीकडे वळून खराडी गाव किंवा युआन आयटी पार्ककडे जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग:

वाहनचालकांनी खराडी बायपास चौकातून सरळ पुढे जावे आणि २५० मीटर अंतरावर ‘आपले घर’ बसस्थानकाजवळ यू-टर्न घ्यावा. त्यानंतर खराडी दर्गा चौकात डावीकडे वळून इच्छित स्थळी जाता येईल.

Edited By - Purva Palande

विमानतळ, बाणेर आणि खराडी परिसरात वाहतूक बदल, वाहनचालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
Pune Traffic News : शिवजयंती निमित्त पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; कुठून निघणार मिरवणूक, कसा कराल प्रवास? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com