Pune : पुणेकरांचा प्रवास सुस्साट, एका निर्णयामुळे प्रवाशांना मिळणार वाहतूक कोंडीपासून दिलासा

Pune News : पुण्यातील कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. १५ ऑक्टोबर २०२५ पासून हे आदेश लागू केले जाणार आहेत.
Pune Traffic
Pune Trafficx
Published On
Summary
  • पुण्यातील कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना १५ ऑक्टोबरपासून बंदी लागू होणार आहे.

  • सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहने मार्गावर जाणार नाहीत.

  • अत्यावश्यक वाहने आणि पुणे शहरातील अंतर्गत वाहतूक यावर बंदी नसेल.

सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune Traffic : पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यातील कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांना बंदी करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. या संबंधित आदेशपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. पुढील आदेश येईपर्यंत या मार्गांवर बंदी राहणार असल्याचे आदेशपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा निर्णय मार्गी लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कात्रज बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांस १५ ऑक्टोबरपासून कात्रजकडून किवळेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सकाळी ८ ते ११ वाजेदरम्यान तसेच किवळे ते कात्रजकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड, अवजड वाहनांना पुढील आदेश येईपर्यंत बंदी करण्यात असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

Pune Traffic
Thane : ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार; काय आहे सरकारचा प्लान?

पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या या आदेशात पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक ४८ व महामार्ग क्र.४ कडे जाणाऱ्या मार्गिकेवर (जुना पुणे-मुंबई महामार्गावर) किवळेकडून कात्रजकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांना सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.

Pune Traffic
Kalyan : कल्याणकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून सुटका; कल्याणमधील सर्वात मोठा उड्डाणपूल सुरु होणार

या वेळेत सातारा-सांगली-कोल्हापूर बाजूने बेंगलुरू महामार्गावरुन येणारी वाहने शिंदेवाडी टोलनाक्याच्या पुढे येणार नाहीत. तसेच नवी मुंबई, ठाणे, रायगड बाजुने बेंगलोर महामार्गावरुन जाणारी वाहने उर्से टोल नाक्याच्यापुढे व जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहने वडगाव फाट्याच्या पुढे प्रवेश करणार नाहीत. अत्यावश्यक सेवेतील वाहने व पुणे शहरात अंतर्गत भागात जाणारी-येणारी वाहतूकीस हा बंदी आदेश लागू राहणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

Pune Traffic
Dry Fruits Price : दिवाळीचा सण आणखी गोड होणार, सुकामेव्याच्या दरात २० टक्क्यांनी घट; वाचा नवे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com