Pune: पुण्यातून कोरोना संबंधित सर्वात मोठी अपडेट!

मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगाला अक्षरश: वेड लावले.
Pune Corona Update
Pune Corona UpdateSaamTV

प्राची कुलकर्णी

पुणे: मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगाला अक्षरश: वेड लावले. सर्वांना घरात कोंडून घेतले. खेळ, व्यापार, व्यवहार, सगळे जाग्यावर ठप्प झाले. अनेकांनी निराशेचे गर्तेत आत्महत्या केली, अनेकांची कुटुंब रस्त्यावर आली. परंतु मागच्या काही काळापासून राज्य आणि देशात कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. कोरोनाच्या दोन लाटा येवून गेल्या परंतु आता रुग्ण कमी झाले आहेत. पुण्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

पुण्यात (Pune) एक ही कोरोना चा रुग्ण हॉस्पिटलमध्ये सध्या दाखल नाही. पुण्यात एकाही सरकारी हॉस्पिटलमध्ये कोरोना चा एक ही रुग्ण भरती नाहीये. पुणे महानगरपालिकेचे (PMC) सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी या संबंधीची माहिती दिली आहे. नायडू रुग्णालयातून आज शेवटचा रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 98 रूग्ण आहेत यापैकी सगळे गृह विलगीकरणात आहेत.

Pune Corona Update
''भूमिका समाज जोडणारी असावी, दंगलीत जाणारा राजकारण्याचा पोरगा नसतो''

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुण्यात कोरोनाच्या रुग्णांनी कहर केला होता. त्याची थोडक्यात आकडेवारी आपण पाहूयात.

18 एप्रिल 2020 दुसऱ्या लाटेत- 56,650 रुग्ण

22 जानेवारी 2022 एका दिवसात सर्वात जास्त रुग्ण: 8600 रुग्ण

जानेवारी महिन्यात 2022 च्या एका महिन्यात सक्रिय रूग्ण संख्या: 54,000 रुग्ण

8 एप्रिल 2021 दुसऱ्या लाटेत एका दिवसात: 7,100 रुग्ण

पुण्यात सध्या 8 स्वाब सेंटर कार्यरत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com