Pune News: पुण्यात अरविंद सावंत यांच्या विरोधात आंदोलन; CM एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या 'त्या' विधानावरुन कार्यकर्ते आक्रमक

Protest Against Arvind Sawant: या वादाला सुरुवात झाल्यानंतर ते शब्द पवारांनी वापरला नाही, तो शब्द माझा आहे, अशी सारवासारव अरविंद सावंत यांनी केली आहे.
Pune Protest Against Arvind Sawant
Pune Protest Against Arvind SawantSaamtv

Pune News: शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या एका वक्तव्याने सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का असा सवाल विचारल्याचा मोठा गौप्यस्फोट अरविंद सावंत यांनी केला होता.

त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अरविंद सावंत यांच्या या वक्तव्याविरोधात पुण्यामध्ये आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

Pune Protest Against Arvind Sawant
Rahul Gandhi Latest Tweet: सूरत कोर्टानं दिलासा दिल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मित्रकालविरुद्ध लोकशाही...'

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील अलका टॉकीज चौकात शिवसेनेकडून अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनादरम्यान सावंत यांच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले. शिवाय अरविंद सावंत यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. या आंदोलन पुण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

आंदोलनादरम्यान, अरविंद सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच त्यांची प्रतिमाही जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. अरविंद सावंत यांनी त्यांच्या या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

Pune Protest Against Arvind Sawant
Kolhapur News: संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये हाणामारी; कार्याध्‍यक्ष निवडीवरून वाद

काय म्हणाले होते अरविंद सावंत?

महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी शरद पवार म्हणाले होते, काँग्रेसमध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण असे दोन दोन मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील, अजित पवार यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?” असे विचारले होते, असे वक्तव्य अरविंद सावंत यांनी एका सभेत बोलताना केले होते, त्यांच्या याच वक्तव्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे..(Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com