Vijay Wadettiwar: पुणेकर वाहतूक कोंडीने हैराण; विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका, विजय वडेट्टीवार यांची माहिती

Vijay Wadettiwar On Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीमुळे नागरिक झाले आहेत. प्रशासनानं वेळीच पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSaam Tv
Published On

Pune Traffic Issue

पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न (Pune Traffic) दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मेट्रोचं नियोजन, शून्य कामं, ढिसाळ नियोजन या सगळ्यामुळं पुणेकर हैराण आहेत. विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीमुळं विद्यार्थी अक्षरशः रडत आहे. विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. याला मेट्रो आणि पालिका प्रशासन जबाबदार आहे, असं विजय वडेट्टीवार ((Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे.  (Latest Marathi News)

त्यामुळं मेट्रो प्रशासनाला तात्काळ वठणीवर आणलं पाहिजे. पालिका प्रशासनानं याबाबत काटेकोर नियोजन करावं. अन्यथा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षेचे पेपर चुकण्याचा घटना पुन्हा घडू शकतात. त्यामुळं प्रशासनानं वेळीच जागे होऊन पुण्यातील Pune) वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नियोजनबद्ध पायाभूत सुविधांची मागणी

विजय वडेट्टीवार, सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी महत्त्वाचा मुद्दा आहे. पुण्यात विकासाच्या गप्पा करणाऱ्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं (Vijay Wadettiwar On Pune Traffic) पाहिजे. पुण्यातील पालकांसमोर आता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी परीक्षेला वेळेत कसे पोहोचणार? हा मोठा प्रश्न आहे. रिक्षा, ओला, उबेरनं प्रवास करून परीक्षेला जाणं सर्वांना परवडणारं नाही.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, शिवाजीनगर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठादरम्यान आचार्य आनंदऋषीजी चौकात तसंच पाषाण, औंध, बाणेरकडे जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतंय. त्यामुळं नियोजनबद्ध पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाव्यात. नागरिकांकडून महापालिका प्रशासन कोट्यवधींचा कर वसूल (Pune Traffic Issue) करते. मग चांगले रस्ते, पायाभूत सुविधा का उपलब्ध करून दिल्या जात नाही? पुणेकर असं विचारत आहेत.

Vijay Wadettiwar
Pune Police Gangster Parade | पुणे पोलीस आयुक्तालयात गुन्हेगारांची शाळा, पोलिसांनी दिली प्रतिक्रिया

शहरात वाहतूक कोंडींची समस्या

पुण्याचा वाहतूक कोंडीत जगात सातवा क्रमांक आहे. ही माहिती टॉम टॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेल्या अभ्यासातून समोर आलीय. शहरातील वाहतूक कोंडीची प्रमुख कारणं समोर आली (Pune News) आहेत. वाहतूक पोलिसांची कमी संख्या, शहरात सुरू असलेली नियोजनशून्य विकास कामं ही वाहतूक कोंडीची कारणं आहेत.

पुण्यातील सत्ताधारी व्हिआयपींच्या गाड्यांसाठी वेगळा मार्ग आरक्षित आहे. त्यामुळं त्यांना जनतेचा त्रास दिसत नाही, ही आजची वस्तुस्थिती असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Vijay Wadettiwar
Pune Police Gangster Parade | पुणे पोलिस आयुक्तांचा गुंडांना दणका,गजानन मारणे,निलेश घायवळची परेड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com