Pune News: पोहण्याचा मोह बेतला जीवावर; खाणीतील पाण्यात बुडुन दोन १२ वर्षांच्या मुलांचा मृत्यू, वाघोलीत घटना

Drowned In Mine Water: पुण्याच्या वाघोली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. खाणीतील पाण्यात पोहायला गेलेल्या दोन १२ वर्षाच्या मुलांचा मृत्यू झालाय.
boys Drowned In Mine Water
boys Drowned In Mine WaterSaam Tv
Published On

Drowned In Mine Water In Wagholi

पुण्यातील वाघोली (Wagholi) येथे एक हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. दोन बारा वर्षाच्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. ही घटना सोमवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. वाघोली येथील शिवरकर वस्ती परिसरातील खाणीतील पाण्यात दोन १२ वर्षाचे मुले बुडाले आहेत.  (Latest News)

वाघोली ( Wagholi) पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाने या मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अली अहमद शेख आणि कार्तिक दशरथ डूकरे (दोघेही रा शिवरकर वस्ती, वाघोली) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की काय घडलं

तीन मुले पोहण्यासाठी येथील शिवरकर वस्ती परिसरातील खाणीत ( Wagholi) गेले होते. त्यातील दोन मुले पोहण्यासाठी खाणीततील पाण्यात उतरले, तर तिसरा मुलगा बाहेरच होता.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेले दोघेजण बुडाले. तिसऱ्या मुलाने जाऊन ही माहिती नातेवाईकांना सांगितली. नंतर नातेवाईकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी अग्निशामक दलाला कळविले. एका स्थानिक व्यक्तीने एक तर अग्निशामक कर्मचाऱ्याने दुसरा मृतदेह बाहेर (Pune News) काढला.

boys Drowned In Mine Water
CEO Death Video: हटके एन्ट्री जीवावर बेतली, लोखंडी पिंजऱ्यातून पडून कंपनीच्या CEOचा मृत्यू, VIDEO आला समोर

सावधगिरी बाळगणं आवश्यक

या घटनेमुळं दोघांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळं शिवरकर वस्तीमध्ये हळहळ व्यक्त केली (Drowned In Mine Water) जातेय. लहान मुलांना पाण्याचे चांगलेच आकर्षण असतं. या दोघानांही पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पाण्यात उतरण्याअगोदर सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. पालकांशिवाय लहान मुलांनी असा प्रयत्न करणं (Pune News) टाळावं.

boys Drowned In Mine Water
Leopard Death : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; मुंबई आग्रा महामार्गावरील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com