Pune Traffic News : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल; कसा कराल प्रवास? पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

Pune Traffic Police News : पुण्यामध्ये पोलीस दलाचा 'तरंग २०२५' हा कार्यक्रम आज संपन्न होणार आहे. या भव्यदिव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी पुणे शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Pune Traffic News
Pune Traffic NewsSaam Tv
Published On

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

Pune News : पुणे शहर पोलीस दलाच्या वतीने 'तरंग २०२५' हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आज (१५ फेब्रुवारी) सायंकाळी पुण्यात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने शहरात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.

पुण्यामध्ये पोलीस दलाच्या तरंग २०२५ या कार्यक्रमामुळे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदलांनुसार, मॉडर्न चौक ते डेक्कन वाहतूक विभागापर्यंतचा (१०० मीटर) या मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे. तर वसंतराव देशमुख पथ (घोले रोडने येणारी) वाहतूक बंद करण्यात येत आहे. जे एम रोडवरुन सुरभी लेनकडे जाणारी वाहतूक देखील बंद राहणार आहे.

प्रवाशांना मॉडर्न चौक - झाशी राणी पुतळा चौक - घोले रोड मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. नागरिकांनी प्रवास करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतूक कर्मचारी आणि स्वयंसेवक यांना कामामध्ये सहकार्य करावे असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त यांनी केले आहे. हे बदल आजच्या दिवसापुरते असणार आहेत.

Pune Traffic News
MHADA : म्हाडा कार्यालयात पैशांचा पाऊस, आंदोलक महिलेने अधिकाऱ्याच्या दालनात उधळल्या नोटा

पोलीस दलाच्या अंतर्गत दवर्षी 'तरंग' या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा तरंग २०२५ मध्ये सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या संगीत रजनीचा मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. परिणामी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

Pune Traffic News
Mega Block: मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, कसं असेल वेळापत्रक? वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com