Dnyaneshwar Mauli Palkhi: वर्षानुवर्षांची परंपरा खंडीत, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत वारकरी आक्रमक! रथासमोर ठिय्या; निरास्नानानंतर काय घडलं?

Sant Dnyaneshwar Mauli Palakhi News: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू आहे. आज माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये आगमन झाले.
Dnyaneshwar Mauli Palkhi: वर्षानुवर्षांची परंपरा खंडीत, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत वारकरी आक्रमक! रथासमोर मांडला ठिय्या; नेमकं काय घडलं?
Sant Dnyaneshwar Mauli Palakhi News:Saamtv
Published On

पुणे, ता. २६ जुलै २०२४

आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथाच्या पाठीमागच्या वारकऱ्यांना पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकरी आक्रमक झाले. यावेळी वारकऱ्यांनी संताप व्यक्त करत पालखीसमोर ठिय्या मांडला, ज्यामुळे मोठा गोंधळ झाला.

Dnyaneshwar Mauli Palkhi: वर्षानुवर्षांची परंपरा खंडीत, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत वारकरी आक्रमक! रथासमोर मांडला ठिय्या; नेमकं काय घडलं?
Pune Breaking: मुसळधार पावसामुळे पुण्यात ६ जणांचा मृत्यू; आजही ऑरेंज अलर्ट, प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा परतीचा प्रवास सुरू आहे. आज माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये आगमन झाले. या परतीच्या प्रवासात पुरंदर तालुक्यातील निरा येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरास्नान घातले जाते. हे निरास्नान झाल्यानंतर रथाच्या पुढे आणि पाठीमागे ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्यातील वारकऱ्यांना दर्शनासाठी पादुका ह्या त्या दिंड्यापर्यंत न्यायला जातात.

मात्र, यावर्षी निरास्नान झाल्यानंतर रथाच्या पुढे फक्त पादुका दर्शनासाठी नेण्यात आल्या, रथाच्या पाठीमागे पादुका येणार नसून वारकऱ्यांनी रथामध्ये येऊन दर्शन करावे असे सांगण्यात आल्यानंतर वारकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त वारकऱ्यांनी पालखी पुढेच पुढे ठिय्या मांडला. त्यानंतर पालखीचा रथ आणि पालखी पुढील दिंड्या पुढे निघून गेल्या तर रथाच्या पाठीमागील दिंड्या या नीरा नदीच्या पुलावर थांबल्या.

Dnyaneshwar Mauli Palkhi: वर्षानुवर्षांची परंपरा खंडीत, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत वारकरी आक्रमक! रथासमोर मांडला ठिय्या; नेमकं काय घडलं?
Akola Accident: एक चूक अन् भयंकर अपघात! कार- ट्रकची समोरासमोर धडक, २ जागीच ठार; भाजप कार्यकर्त्यासह १ गंभीर जखमी

नीरा नदी परिसरात विणेकरांनी संताप व्यक्त करत परंपरा मोडित काढू नका अशी मागणी केली. तसेच रथामागे चालणाऱ्यांना दर्शन देत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी भूमिका यावेळी वारकऱ्यांनी घेतली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊलींचा रथ पुढे गेला मात्र मागच्या दिंड्या थांबून होत्या. आता काही वेळांपूर्वी या रथाच्या मागील दिंड्या देखील मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Dnyaneshwar Mauli Palkhi: वर्षानुवर्षांची परंपरा खंडीत, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत वारकरी आक्रमक! रथासमोर मांडला ठिय्या; नेमकं काय घडलं?
Sanjay Raut Vs Raj Thackeray: 'विधानसभेच्या २५० जागा लढणार', राज ठाकरेंची घोषणा, संजय राऊतांचा सणसणीत टोला; म्हणाले...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com