Viral Video : RPF जवान नसता, तर हा माणूस आज जिवंत नसता, थरारक घटना CCTVत कैद

आरपीएफ जवानाने या प्रवाशाला बाजूला खेचत त्याचे प्राण वाचवले.
Pune Railway Station RPF Jawan Viral Video
Pune Railway Station RPF Jawan Viral VideoSaam TV

पुणे : धावत्या रेल्वेमध्ये (Railway) चढणे किंवा उतरणे हे धोकादायकच असते.' प्रवाशांनो धावत्या रेल्वेत चढू नका तसेच उतरूही नका' असं रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जातं. मात्र, तरी देखील प्रवासी नको ते धाडस करून स्वत:चा जीव धोक्यात घालतात. अशीच एक घटना पुणे (Pune) रेल्वे स्थानक परिसरातून समोर आली आहे. (Pune News Today)

Pune Railway Station RPF Jawan Viral Video
Dance Video : महिलांचा असा डान्स तुम्ही कधी बघितला नसेल; VIDEO पाहून थक्क व्हाल

येथे एका प्रवाशाने धावत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, तो फलाटावर कोसळला. हा व्यक्ती रेल्वेखाली खेचल्या जाणार इतक्यात, तेथे कर्तव्यावर असलेला एक आरपीएफ जवान देवदुताप्रमाणे धावून आला. आरपीएफ जवानाने या प्रवाशाला बाजूला खेचत त्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, ही थरारक घटना शनिवारी (४ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास घडली. हैदराबादहून पुण्याकडे येणारी हुसैन सागर एक्सप्रेस पुणे रेल्वेस्थानकावर थांबली होती. त्याचवेळी गाडी पुढच्या स्टेशनवर जाण्यासाठी निघाली असता, एका प्रवाशाने धावत्या रेल्वेतून उडी मारली. गाडीचा वेग जास्त असल्याने हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवर कोसळला. (Railway Accident Viral Video)

रेल्वेसोबत तो खाली खेचला जाणार इतक्यात तेथे कर्तव्यावर असलेल्या एका आरपीएफ जवानाने त्याला बाजूला खेचले. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दरम्यान, रेल्वेतून उडी मारलेल्या या प्रवाशाला पुणे रेल्वेस्टेशनलाच उतरायचं होतं. मात्र, झोप लागल्याने त्याला स्टेशन आल्याचं कळालंच नाही. जेव्हा रेल्वेचा हॉर्न वाचला तेव्हा या प्रवाशाला स्टेशन आल्याचं कळालं. त्यानंतर त्याने घाईगरबडीत रेल्वेतून उडी घेतली.ट

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com