Rajgad Fort : सावधान! किल्ले राजगडावर रात्रीच्या मुक्कामाला जाताय? मग ही बातमी वाचाच...

तुम्ही जर किल्ले राजगडावर पर्यटकासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.
Rajgad Fort News
Rajgad Fort NewsSaam TV

Rajgad Fort News : तुम्ही जर किल्ले राजगडावर पर्यटकासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्यावर यापुढे पर्यटकांना रात्रीच्या मुक्कामाला बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने बुधवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे. या आदेशाचे पालन न केल्यास तीन महिने कैद आणि ५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Rajgad Fort News
Aurangabad News : औरंगाबादचं 'संभाजीनगर' नामकरण वेटिंगवरच? केंद्र सरकारने हायकोर्टात काय सांगितलं?

पुरातत्व विभागाने या आदेशाच्या प्रती भोरचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार वेल्हे, गुंजवणे आणि पाल बुद्रुकचे ग्रामसेवक यांना दिल्या आहेत. कोरोना संकटकाळात राज्यातील पर्यटनस्थळे बंद होती. मात्र, नियमावली शिथील होताच राजगडावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

आठवड्याच्या अखेरीस राजगडावर (Rajgad Fort) तीनशेहून अधिक पर्यटक येतात. त्यातच काही जणांकडून उघड्यावर प्रात:विधी केला जात असल्यामुळे किल्ल्याच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ‘ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन करणे, पावित्र्य सांभाळणे, स्वच्छता राखण्याकडे लक्ष देताना प्रशासनावर ताण येतो. वारंवार सूचना देऊनही पर्यटकांना फारसा फरक पडत नाही,’ असे किल्ल्यावरील सेवक बापू सांबळे यांनी सांगितले.

त्यामुळे यापुढे रात्रीच्या मुक्कामाला पुराणवस्तुशास्त्र अधिकारी, त्यांचे अभिकर्ते, त्यांच्या हाताखालील व्यक्ती, कामगार आणि अशा भागांत कामावर असलेला कोणताही इतर सरकारी सेवक यांच्या व्यतिरिक्त कायमचा अथवा विशिष्ट मदतीसाठी खुला असणार नाही, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

Rajgad Fort News
Maharashtra Politics : मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागली; 'सामना'तून शिंदे गटाला चिमटे

दोन दिवसांत वेल्हे तालुका तहसीलदार व संबंधितांची बैठक घेऊन याबाबत बोलताना आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना देण्यात येणार आहेत. आदेशांचे उल्लंघन केल्यास नियमातील तरतुदीनुसार संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार कचरे यांनी सांगितले.

जी कोणी व्यक्ती या उपबंधाचे उल्लंघन करील, त्यास ‘महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० मधील कलम ३३ (१) अन्वये पराकाष्ठा तीन महिने मदतीच्या कैदेची शिक्षा किंवा पाच हजार रुपये दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील. ऐतिहासिक वास्तू व किल्ल्यांचे जतन, संवर्धन, स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे, असं पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी सांगितलं आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com