Sharad Pawar Speech: मला 'शरद पवार' म्हणतात, लक्षात ठेवा... सुनील शेळकेंना थेट इशारा; पवार का संतापले?

Sharad Pawar On MLA Sunil Shelke: कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा देत मलाही शरद पवार म्हणतात, अशा शब्दात सज्जड दम दिला.
Sharad Pawar On MLA Sunil Shelke:
Sharad Pawar On MLA Sunil Shelke: Saam Digital
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. ७ मार्च २०२४

Sharad Pawar Speech:

 आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मावळ तालुका कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. यावेळी कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा देत मलाही शरद पवार म्हणतात, अशा शब्दात सज्जड दम दिला. नेमकं काय म्हणाले शरद पवार, वाचा सविस्तर.

काय म्हणाले शरद पवार?

"मला असं समजलं तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येताय म्हणून तुम्हाला धमकी दिली जात आहे. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके (Sunil Shelke) तुम्ही आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवा. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही..." असा थेट इशारा शरद पवार यांनी दिला.

मोदी- शहांवर हल्लाबोल..

"देशाचे गृहमंत्री आपल्या राज्यात आले होते. मुंबईतील भाषणात सांगितलं की पन्नास वर्षे शरद पवार बसलेत. मी त्यांचा आभारी आहे, पन्नास वर्षे जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला, हे अमित शाह यांनी मान्य केलं,असा टोला शरद पवार यांनी लगावला. तसेच गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली,"" अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान मोदींवरही हल्लाबोल केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sharad Pawar On MLA Sunil Shelke:
Solapur : किडवाई ते बारा इमाम चौकातील नवीन रस्ता 10 दिवसांतच खोदला; नागरिकांनी खड्ड्यांची पूजा करून रस्त्याला घातला हार

ममता बॅनर्जींचे कौतुक..

"काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कोलकात्यात होते आणि त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर बोलले. मी ममता बॅनर्जी यांच्या घरी जाऊन आलो आहे. १० बाय १० मध्ये राहणाऱ्या भगिनी हिने राज्याचे नेतृत्व केलं. ममता बॅनर्जी यांच्यावर जनता कायम विश्वास ठेवत आलीये. पण त्या बघिणीवर मोदी बोलतायेत. हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, मोदींना हे शोभत नाही," अशी टीकाही शरद पवार यांनी केली. (Latest Marathi News)

Sharad Pawar On MLA Sunil Shelke:
Crime News: साडेतीन वर्षाच्या बालकाला पाण्यात फेकलं; 'मृत्यू'चा थरार सिसिटीव्हीमध्ये कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com