Pune News : पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट

Pune Mahapalika Commissioner on Water Level : पिण्याच्या पाण्याचा वापर केल्यास बांधकाम बंद ठेवावं लागेल असा सज्जड दम महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
Khadakwasla
KhadakwaslaSaam TV

अक्षय बडवे | पुणे

Pune News :

पुण्यातील खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. उन्हाळ्यातील पाणीवाटपाचं नियोजन करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामांसाठी न करण्याच्या सूचना आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिल्या. पिण्याच्या पाण्याचा वापर केल्यास बांधकाम बंद ठेवावं लागेल असा सज्जड दम महापालिका आयुक्तांनी दिला आहे.

पिण्याच पाणी बांधकामासाठी, मेट्रोसाठी वापरू नका. मैला शुद्धीकरण केंद्रातील पाणी बांधकामासाठी वापरण्यास बांधकाम व्यावसायिकांचा मात्र विरोध आहे. असं असलं तरी पिण्याच पाणी बांधकामासाठी वापरात येणार नाही. समाविष्ट ३४ गावाच्या पाण्याच्या नियोजनाची आयुक्त राजेंद्र भोसले यांनी बैठक घेतली. (Pune News)

Khadakwasla
MHADA : म्हाडाचे २५०० कोटी रुपये सरकारकडे थकीत; वर्षानुवर्षे ना व्याज, ना परतावा

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात ३० टक्के पाणीसाठा

मुंबईच्या ७ तलावांमध्ये सध्या ३० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठी शिल्लक आहे. गेल्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक कमी पाणीसाठा आहे. मात्र ३१ जुलैपर्यंत मुंबईकरांना हा पाणीसाठा पुरेल असा विश्वास बीएमसीकडून व्यक्त करण्यात आला आहे. पाणीसाठी कमी झाला असला तरी देखील मुंबईकरांना पाणीकपात सहन करावी लागणार नाही. कारण मुंबईमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये काही राखीव जलसाठ्यांचा देखील समावेश आहे.

Khadakwasla
Panvel-Karjat Suburban Railway Line : पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावर लवकरच धावणार ट्रेन; काय आहे स्थिती? जाणून घ्या

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ पाणलोट क्षेत्रांतील तलावांमध्ये सुमारे 4.3 लाख दशलक्ष म्हणजेच 30% इतका पाणीसाठा आहे. भातसा धरणात (१.४ लाख दशलक्ष लीटर) आणि अप्पर वैतरणा (९३,५०० दशलक्ष लिटर) येथील राखीव पाणीसाठा वाढवण्यात येणार आहे. यासाठी फेब्रुवारीमध्ये राज्य पाटबंधारे विभागाच्या मंजुरी देखील दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com