Pune News : ट्रक-गॅस टँकरच्या धडकेनंतर सुरू होती गॅसगळती; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ

Pune Accident News : लोणीकंद - केसनंद रोडवरील बाबा पेट्रोल पंपावर ट्रक आणि गॅस टँकरची धडक झाली. या अपघातात टँकरमधील गॅस गळती सुरू झाली होती. तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही गळती रोखण्यात यश आलं आहे.
Pune News
Pune NewsSaam Digital

Pune News

लोणीकंद - केसनंद रोडवरील बाबा पेट्रोल पंपावर ट्रक आणि गॅस टँकरची धडक झाली. या अपघातात टँकरमधील गॅस गळती सुरू झाली होती. लोणीकंद पोलीसांनी व वाहतूक पोलीस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीसाठी रस्ता बंद केला. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून गॅस गळती बंद केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सकाळी आठ वाजता घडली होती. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गळती थांबवण्यात यश आलं आहे.

लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद - केसनंद रोडवरील बाबा पेट्रोल पंपावर ट्रक आणि गॅस टँकरची धडक झाली. या धडकेने गॅस टँकरमधील गॅसची गळती सुरू झाली. पोलीसांना कळताच त्यांनी तात्काळ दोन्ही कडील रस्ता बंद करून आजूबाजूच्या गावातील लोकांना अलर्ट केलं. गॅस ज्वलनशील असल्याने दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तात्काळ गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आलं. त्यांनीही घटनास्थळी धाव घेत उपाययोजना करून गळती थांबविली व तेथून टँकर हलविला. सुमारे तीन तास ही सर्व घटना सुरू होती. साडे अकरानंतर सर्व सुरळीत झाले.

Pune News
Karad Airport : धावपट्टीवर उतरताना विमानतळाच्या भिंतीवर धडकले विमान; कराड विमानतळावरील घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com