>>सचिन जाधव
Pune Crime News: अभिनेता शाहिद कपूरचा 'फटा पोस्टर निकला हिरो' हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात शाहिद कपूर त्याच्या आईला इम्प्रेस करण्यासाठी आपण पोलीसमध्ये असल्याचे खोटं सांगतो आणि नंतर त्याची पुढे कशी फजिती होते हे दाखवण्यात आलं होतं.
परंतु असाच एक खराखुरा किस्सा पुण्यात घडला आहे. येथे पोलिसांच्या वर्दीत फिरणाऱ्या आणि आपण पोलीस असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र त्याने केलेला खुलासा धक्कादायक आहे.
चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार महाडिक पथकासह औंध परिसरात गस्त घालत असताना एक तरुण पोलीस शिपायाचे गणेश परिधान केलेला आढळला. या बनावट पोलीसाची चौकशी केली असता आपण औंध पोलीस चौकीमध्ये पोलीस शिपाई पदावर कार्यरत असल्याचे सांगल्याचे त्याने सांगितले.
मात्र इथेच त्याचे बिंग फुटले आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. कारण औंध पोलीस चौकीमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनाच त्याने आपण तिथे कार्यरत असल्याचे सांगितले. त्याच्या या दाव्यामुळे पोलीसही आश्चर्यचकित झाले. (Pune Crime)
यशवंत धुरी असे या बनावट पोलीस शिपायाचं नाव आहे. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली तेव्हा त्याने केलेला खुलासा तेवढाच धक्कादायक होता. प्रेयसीला खूश करण्यासाठी तो बनावट पोलीस शिपाई बनून या भागात वावरत असल्याचे त्याने सांगितले. एवढेच नाही तर आपल्याला पोलीस होण्याची इच्छा आहे त्यामुळे पोलिसांचा गणवेश परिधान केला असा खुलासा देखील या बनावट पोलीस अधिकाऱ्याने केला. (Pune News)
दरम्यान या प्रकरणी यशवंतला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. तसेच आरोपी यशवंत धुरी याने याआधी काही गुन्हे केले आहेत का? याचाही तपास पोलीस करत आहेत. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.