Hindu Mahasangh Demand: मंदिरात येणाऱ्यांचे आधारकार्ड तपासा, हिंदू महासंघाची अजब मागणी

Latest News: दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जमावाने घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला होता.
Trimbakeshwar Temple, Nashik
Trimbakeshwar Temple, Nashiksaam tv

Pune News: 'मंदिरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे आधारकार्ड तपासा', अशी अजब मागणी हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जमावाने घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मंदिर प्रशासनाने केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. आता हाच मुद्दा हिंदू महासंघाने उचलून धरला असून त्यांनी ही अजब मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Trimbakeshwar Temple, Nashik
Chhatrapati Sambhaji Nagar News : कांद्याला एक रुपया भाव... शेतकरी आक्रमक, राेखला वैजापूर गंगापूर महामार्ग (पाहा व्हिडिओ)

हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'राज्यातील सर्व महत्वाच्या मंदिरात येणाऱ्या नागरिकांचे आधारकार्ड पाहूनच प्रवेश द्यावा. तेढ निर्माण करण्याचा, मंदिरे आणि मूर्ती विटंबनेचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे आधीच काळजी घेतलेली बरी म्हणून ही मागणी करण्यात आली आहे.'

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जमावाकडून बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने मंदिर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले. त्र्यंबकेश्वर मंदिरात परिसरात तणाव निर्माण होताच पोलिसांच्या आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर हा तणाव निवळला.

Trimbakeshwar Temple, Nashik
Accident News: कोरोनापेक्षाही भयंकर! छत्रपती संभाजीनगरमधील अपघात आणि मृत्यूची आकडेवारी चिंताजनक

दरम्यान, या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात जमावाने घुसण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेप्रकरणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com