Osho Ashram Pune: मोठी बातमी! पुण्यातील ओशो आश्रमामध्ये मोठा वाद, जबरदस्तीने अनुयायी घुसले; पोलिसांचा लाठीमार

Pune News Update: आश्रम व्यवस्थापनाच्या दबावाला बळी न पडता जबरदस्तीने गेट उघडून अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला...
Pune News
Pune NewsSaamtv
Published On

Koregaon Park Pune: पुण्यातील कोरेगाव पार्कमधील ओशो आश्रमात ओशो संबोधी दिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी ओशो आश्रमात मोठा वाद झाल्याची बातमी सध्या समोर येत आहे. आश्रमामध्ये प्रवेश दिला जात नसल्याने पोलिस आणि अनुयायांमध्ये झटापटीची घटना घडली आहे. यावेळी आश्रम व्यवस्थापनाच्या दबावाला बळी न पडता जबरदस्तीने गेट उघडून ओशो अनुयायांनी आश्रमात प्रवेश केला. त्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे (Latest Marathi News)

Pune News
Mumbai Traffic Update: राज ठाकरेंच्या सभेमुळे मुंबईच्या वाहतूकीत होणार मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग अन् पार्किंग व्यवस्था

याबाबत अधिक माहिती अशी की, ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले. काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली.

आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर १५० ते २०० ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला. (Pune News)

Pune News
Dhule News: कोट्यावधीचा गुटखा, पानमसाला जप्‍त; सात जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

आश्रमाच्या आतमध्ये जाऊन व्यवस्थापनाचा निषेध करणाऱ्या अनुयायांनी बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मोठी फौज दाखल झाली. पोलिसांनी वारंवार समजूत काढूनही अनुयायी आपल्या मागण्यांवर ठाम होते. ओशो आश्रमाच्या बचावासाठी व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतले आहे.

या लाठीमारात अनेक अनुयायी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या प्रकारानंतर आश्रमस्थळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर आश्रमाबाहेर अनुयायांनी गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com