Anju Tai Return 10 lakh To Owner
HONEST ANJU TAI RETURNS LOST BAG CONTAINING ₹10 LAKH IN PUNEsaam tv

Pune News: प्रामाणिक अंजूताई! मालकाचा शोध घेत परत केली सापडलेली 10 लाख रुपयांची बॅग

Anju Tai Return 10 lakh To Owner: आता तुम्हाला आश्चर्याचा धक्का देणारी बातमी. एका कचरा वेचणाऱ्या महिलेला तब्बल १० लाख रुपयांची बॅग सापडली. पुण्यातल्या या महिलेनं या पैशांचं काय केलं? ते कुणाला दिले? यावरचा हा विशेष रिपोर्ट.
Published on
Summary
  • अंजूताईंना सापडली कचरा वेचताना १० लाखांनी भरलेली बॅग .

  • मालकाला शोधून परत केले १० लाख रुपये

  • पुण्यात आणि सोशल मीडियावर अंजूताईंच्या प्रामाणिकपणाचं भरभरून कौतुक होतंय.

कुणीतरी विसरून गेलेली एखादी बॅग तुम्हाला सापडली. तुम्ही ती उघडून बघितल्यावर त्यात एक दोन नाही तब्बल दहा लाख रूपयांची बंडल दिसली तर तुम्ही काय कराल.जरा विचार करा. पुण्याच्या कचरा वेचणाऱ्या अंजूताईला नेहमीप्रमाणे काम करताना तब्बल दहा लाख रुपयांनी भरलेली बॅग सापडली. मात्र अंजूताईनं नेमकं काय केलं ते त्यांच्याकडूनच ऐका.

Anju Tai Return 10 lakh To Owner
Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

अंजूताई याच परिसरात काम करत असल्यानं त्यांनी इतरांच्या मदतीनं त्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे, मूळ मालकाशी संपर्क झाला आणि अंजूताईंनी संपूर्ण दहा लाख रुपयांची रोकड आणि औषधे परत केली. माणूस गरीब असो वा श्रीमंत तो मनाने सच्चा असायला हवा हेच अंजू माने यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं..आज जिथे पै पैशासाठी रक्ताची नातीही विसरली जातात तिथे अंजूताईंची ही कृती आदर्शवतच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com