Pune: एक काॅल...प्राॅब्लेम साॅल्व्ह!...काय आहे समस्या निवारणाचा 'पुणे फर्स्ट पॅटर्न'

सभागृह नेते गणेश बीडकर यांनी एक उपाय राबवायला सुरुवात केलीये. त्यांचा हाच पॅटर्न आता भाजपचे अनेक नगरसेवक राबवत आहेत. 'एक काॅल प्राॅब्लेम साॅल्व्ह' अशी ही योजना
Pune: एक काॅल...प्राॅब्लेम साॅल्व्ह!...काय आहे समस्या निवारणाचा 'पुणे फर्स्ट पॅटर्न'
Pune: एक काॅल...प्राॅब्लेम साॅल्व्ह!...काय आहे समस्या निवारणाचा 'पुणे फर्स्ट पॅटर्न'- Saam TV
Published On

पुणे : लोकप्रतिनिधी म्हणजे लोकसेवकच...शहराच्या विकासाबरोबरच लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचं काम लोकप्रतिनिधींना अर्थात शहराचा विचार करायचा तर नगरसेवकांना करावी लागतात. 'हे काम आपले नव्हेच' असे कधी म्हणता येत नाही. लोकांच्या वाढत्या अपेक्षा कराव्यात तरी कशा असा प्रश्न लोकप्रतिनिधींना पडत नसेल तरच नवल. (Pune Ganesh Bidkar Pune First Pattern)

यावर पुण्यात (Pune) सभागृह नेते गणेश बीडकर यांनी एक उपाय राबवायला सुरुवात केलीये. त्यांचा हाच पॅटर्न आता भाजपचे (BJP) अनेक नगरसेवक राबवत आहेत. 'एक काॅल प्राॅब्लेम साॅल्व्ह' अशी ही योजना.

झाड कापायचंय, रस्त्यावरचे दिवे लागत नाहीत, पाणी पुरेशा प्रेशरने येत नाहीये, रस्त्यावरच खूप खड्डे पडलेत, घरासमोरचा रस्ता उखडून ठेवलाय....एक ना दोन. या सगळ्या रोजच्याच समस्या. त्या सोडवायला जायचं कुठं, क्षेत्रीय कार्यालयात गेलो तर आपली समस्या सुटेल का चकरा मारायला लागतील, असे प्रश्न नागरिकांना पडतच असतात.

यासाठी गणेश बीडकरांनी उभी केली 'टीम बिडकर'. ५० हून अधिक कार्यकर्त्यांच्या टीमची यादीच प्रभागातल्या नागरिकांकडे दिली गेलीये. ती सुद्धा या कार्यकर्त्यांच्या फोन नंबरसह. महापालिकेच्या विविध विभागांची जबाबदारी या टीमच्या गटप्रमुखांकडे दिली आहे. नागरिक या नंबरवर काॅल करुन आपली समस्या सांगतात. मग संबंधित विभागांकडे या समस्यांचा फाॅलोअप घेतला जातो आणि ही समस्या सोडवल्यावर संबंधित नागरिकांना त्याची माहितीही दिली जाते.

रास्ता, मंगळवार आणि सोमवार या पेठा व परिसर जुन्या पुण्याचा. साहजिकच नागरी समस्यांचे प्रमाण इथं अधिक आणि मिश्र स्वरुपाचे. इथे सोसायट्या, अपार्टमेंट आहेत, तसेच वाडेही आहेत आणि छोट्या वस्त्याही. त्यामुळे प्रत्येकाच्या प्रश्नांचे स्वरुप वेगळे. साहजिकच इथल्या लोकप्रतिनिधींचा बहुतांश वेळ नागरिकांच्या समस्या सोडवण्यातच जातो.

अनेकदा प्रत्येक समस्या जाणून घेणे आणि तिचा पाठपुरावा करणे हे एकट्या लोकप्रतिनिधीच्या आवाक्याबाहेर जाते आणि त्यातून त्यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. समुहशक्तीतून प्रभागाचा विकास हे तत्त्व इथं राबवलं जातंय.

हाच पॅटर्न आता शहराच्या इतर प्रभागांतही राबवायला तिथल्या लोकप्रतिनिधींनी सुरुवात केलीये. हाच पॅटर्न पक्षविरहित भावनेतून सगळ्याच लोकप्रतिनिधींनी राबवला तर पुणे शहर स्मार्ट बनू शकतं.

Pune: एक काॅल...प्राॅब्लेम साॅल्व्ह!...काय आहे समस्या निवारणाचा 'पुणे फर्स्ट पॅटर्न'
Pune: पुणे शहर काँग्रेसला खिंडार, गटनेत्याच्या पुतण्याचा भाजपात प्रवेश!

जरी प्रत्यक्ष नगरसेवक भेटला नाही तरी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क ठेवणे शक्य होते. सभागृह नेता या नात्याने प्रभागाबरोबच शहराच्या प्रश्नांसाठी मला काम करावे लागते. त्यामुळे प्रभागातल्या नागरिकांच्या समस्यांच्या निवारणासाठी एक 'टीम' उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा प्रभागातल्या नागरिकांना चांगला फायदा होतो आहे, असे बीडकर यांनी सांगितले. जरी प्रभागातल्या कामे माझ्या नांवावर दिसत असली तरीही त्यात या टीमचा वाटाही मोठा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या काळात प्रभागातल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही घराघरात पोहोचून जनजागृती केली. तसेच नागरिकांना विनासायास लस मिळावी, यासाठीही कार्यकर्त्यांनी मेहेनत घेतली. महापालिका व आरोग्य विभागाशी सततचा समन्वय ठेवल्याने प्रभागात शंभर टक्के लसीकरण झाल्याचे भाजप पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे सरचिटणीस मयूर दरेकर यांनी सांगितले.

हे देखिल पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com