सागर आव्हाड
पुणे : स्वत:ला भ्रष्टाचार विरोधी गांधीगिरी जनआंदोलनाचा सदस्य म्हणून मिरवणारा व जनहित याचिका दाखल करुन बांधकाम व्यावसायिकांकडून खंडणीची मागणी करणारा तोतया वकिल राजेश बजाज Rajesh Bajaj याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध Builders जनहित याचिका Public interest litigation दाखल करुन ती मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हे देखील पहा-
राजेश ऊर्फ बॉबी खैरातीलाल, बजाज ऊर्फ सचदेव (रा. अकुर, कमला नेहरु पार्कसमोर, डेक्कन जिमखाना), के. अे. कुरेशी (रा. मलकाजी वाडा, खडकी बाजार), अशोक शंकरराव जाधव (रा. राजा बंगलो, खराडी) आणि बापू गोरख शिंदे (रा. नर्हेगाव) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
हा प्रकार एप्रिल 2015 ते 24 जुलै 2019 दरम्यान शिवाजीनगर कोर्ट गेट नं. 3 च्या समोर रोडवर घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण;
याप्रकरणी कोथरुडमध्ये Kothrud Pune राहणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. फिया र्यादीची एक कन्स्ट्रक्शन कंपनी Construction Company आहे. त्यांच्या कंपनीचे बोपोडी Bopodi Pune येथील बांधकामाची परवानगी चुकीची आहे, असे कारण देऊन राजेश बजाज व इतरांनी मुंबई हायकोर्टात सिव्हील अॅप्लीकेशन केले होते.
त्यावेळी तिघांनी 14 सप्टेंबर 2016 रोजी प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात, तिघांनी 20 ते 30 ऑगस्ट दरम्यान राजेश बजाज यांना डेंग्यु झाला व त्यांना बेड रेस्ट घेण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच के अे कुरेशी यांना व्हायरल संक्रमण झाले. त्यामुळे कोर्टात या प्रकरणी सुनावणीच्या वेळी हजर राहू शकले नसल्याचे नमूद केले. त्या तिघांनी सादर केलेले मेडिकल प्रमाणपत्र Medical Certificate हे बनावट करुन दाखल केल्यामुळे कंपनीची व कोर्टाची फसवणुक केली. तसेच हायकोर्टात जनहित याचिकेची फेरसुनावणी करण्याकरीता केलेल अर्ज मागे घेणेकरीता ऑगस्ट2018 मध्ये शिवाजीनगर कोर्ट गेट नं. 3 च्या समोर रोडवर त्यांनी 1 कोटी रुपयांची मागणी केली. शिवीगाळ करुन कंपनीसह फिर्यादी व फिर्यादीच्या कंपनीचे डायरेक्टर यांना जीवे मारेन अशी धमकी दिली होती.
दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध बिल्डरला 50 लाखांची खंडणी मागून जबरदस्तीने फ्लॅट बळकाविल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात राजेश बजाज व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. राजेश बजाज याने अनेकांची यापूर्वी बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक केली आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांनी राजेश बजाज याच्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा बदनामीचा दावा दाखल केला आहे.
भितीपोटी आम्ही तक्रार अद्याप दिलेली नव्हती;
या चौघांनी आम्हाला जीवे मारण्याची व कंपनीच्या कामकाजामध्ये अडथळे निर्माण करण्याची धमकी देत होते. आणि आमच्या विरोधात विनाकारण न्यायालयात Court अर्ज करीत होते.
त्याच्या या भितीपोटी आम्ही तक्रार अद्याप दिलेली नव्हती. पंरतु, प्रसारमाध्यमातून त्यांच्याविरुद्ध गुन्हा Crime दाखल झाल्याबाबत समजले आणि त्यांनी आम्हाला दिलेल्या त्रासाबाबत त्यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलो. असे असल्याचे गोखले यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. गोखले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेश बजाज याच्यासह चौघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात Shivaji Nagar Police Station Pune गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.