Pune Crime News: पुण्यात पोलिस आणि गुंडामध्ये गोळीबाराचा थरार, फिल्मी स्टाइलने आवळल्या आरोपीच्या मुसक्या

Thrill Of Shooting Between Pune police And Gangster: नव्या वाडकर (१८ वर्षे) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. तो फरार होता असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस पथकं त्याच्या मागे होती.
Pune Crime News
Pune Crime News Saam Tv

अक्षय बडवे, पुणे

पुणे जिल्ह्यातील मुठा गावात पुणे पोलिस (Pune Police) आणि गुन्हेगारामध्ये गोळीबाराचा थरार रंगला होता. कुख्यात गुंड नव्या वाडकरच्या गोळीबाराला गुन्हे शाखेच्या पोलिसांचे गोळीबारानेच उत्तर दिले. आरोपीला पोलिसांनी नव्या वाडकरला बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. नव्या वाडकर (१८ वर्षे) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. तो फरार होता असून गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस पथकं त्याच्या मागे होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुठा गावात सकाळी १० वाजता ही घटना घडली आहे. नव्या वाडकर हा मुळशी तालुक्यातील मुठा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा पाठलाग करत पोलिस त्याच्या मागावर होते. हा पाठलाग सुरू असतानाच वाडकरने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. यातील एकही गोळी त्याला लागली नाही.

Pune Crime News
Pune University : पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्ये विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ; भाजी-चपाती आंबट लागल्याचा आरोप

त्यानंतर नव्या वाडकरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर पुणे पोलिसांनी पाठलाग करून नव्या वाडकरला जेरबंद केले. पुण्यातील २००७ मध्ये पर्वती भागात जनता वसाहतीत निलेश वाडकर आणि सनी चव्हाण उर्फ चॉकलेट सुन्या यांच्या गुन्हेगारी टोळ्या होत्या. कधीकाळी वाडकर हा सनी चव्हाणचा एकदम खास मानला जायचा. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात खटके उडाले आणि वाडकरने स्वतःची टोळी तयार केली.

Pune Crime News
Pune News: पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगत आयटी इंजिनीअरची फसवणूक, १९ लाखांचा गंडा

काही वर्षांपूर्वी गोळीबार केल्याच्या प्रकरणात निलेश वाडकर याला अटक झाली होती. तुरुंगातून सुटून आल्यानंतर निलेश वाडकरचा सनीने खून झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या सनीला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून निलेश वाडकरचा मुलगा असलेल्या नव्या उर्फ नवनाथ वाडकर याने जनता वसाहत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली होती. आज अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. नव्या वाडकरविरोधात ७ गुन्हे दाखल आहेत.

Pune Crime News
Pune Crime News: जमिनीचा वाद तरुणाच्या जीवावर बेतला, मित्रानेच केली मित्राची निर्घृण हत्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com