Pune Crime News: प्रेमात अडथळा ठरणाऱ्या वडिलांना मुलीने आईच्या मदतीने क्रूरपणे संपवलं; हत्येच्या प्लानिंगसाठी वेबसीरिजचा घेतला आधार

Father Killed By Daughter: वारंवार क्राईम वेब सीरिज (Web Series) पाहून त्यांनी हे हत्याकांड केलं आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv

गोपाळ मोटघरे, पुणे

Pune Father Killing Case: पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशामध्ये पुणे हत्येच्या घटनेमुळे पुन्हा हादरले आहे. पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीने प्रेमात अडथळा ठरणाऱ्या आपल्या वडिलांचीच हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेत या मुलीला तिच्या आईने आणि प्रियकराने मदत केली. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वारंवार क्राईम वेब सीरिज (Web Series) पाहून त्यांनी हे हत्याकांड केलं आहे.

Pune Crime News
Odisha Train Accident Update: ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातानंतर चालकांचं झालं तरी काय?, सर्वांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर वाचा सविस्तर

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीतील वृंदावन आनंद पार्क या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. जॉन्सन लोबो असे हत्या झालेल्या 49 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणाचा तपास शिक्रापूर पोलीस करत होते. त्यांनी तब्बल 250 सीसीटीव्ही फुटेज तपासून या हत्याप्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सेंड्रा जॉन्सन लोबो आणि एग्नेल जॉय कसबे या आरोपींना अटक केली. तर मुलीला ताब्यात घेतलं.

आरोपी एग्नेल जॉय कसबे याचे जॉन्सन लोबो यांच्या अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. जॉन्सन यांचा मुलीच्या प्रेम प्रकरणाला विरोध होता पण त्यांची पत्नी सेंड्राची मुलीच्या प्रेमसंबंधाला सहमती होती. त्यामुळे मुलीच्या प्रेम संबंधाला अडथळा ठरणाऱ्या जॉन्सन यांचा काटा त्यांच्या मुलीने आणि आईनेच काढला. या मुलीने आई सेंड्रा लोबो आणि प्रियकर एग्नेल जॉय कसबे यांनी जॉन्सन लोबो यांची हत्या केली.

Pune Crime News
Ahmednagar News : संगमनेरमधील 'भगवा' मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक, अनेक गाड्यांचं नुकसान

राहत्या घरात जॉन्सन लोबो यांच्या डोक्यात वरवंट्याने मारून आणि मानेवर चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर जॉन्सन लोबोचा मृतदेह एक दिवस घरामध्येच लपवून ठेवला होता. त्यानंतर 31 जूनच्या रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एचपी पेट्रोल पंपाजवळ जॉन्सन यांचा मृतदेह पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आला. त्याचसोबत पुराव नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

जॉन्सन लोबो यांच्या हत्येची माहिती कोणालाही कळू नये. तसंच ते जिवंत असल्याचे भासावे म्हणून आरोपींनी त्यांच्या मोबाइलवरुन सतत सोशल मीडियावर स्टेटस चेंज केले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत एग्नेल जॉय कसबे आणि सेंड्रा लोबो यांना अटक केली. तर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. या धक्कादायक घटनेमुळे जॉन्सन लोबो यांच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com