Pune Crime: थकित लाईटबील मागितल्याने महावितरण कर्मचाऱ्यांना डांबून ठेवलं, अंगावर सोडले कुत्रे; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune Deccan Crime News: थकित बील मागण्यासाठी आलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवल्याची घटना डेक्कन परिसरात घडली.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune Crime News:

पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. शहरातील डेक्कन भागातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विजेची थकबाकी मागण्यासाठी गेलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याची घटना डेक्कन परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Pune Crime News
Sharad Pawar News: 'राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं...

याबाबत अधिक माहिती अशी की, पाच हजारांची लाईटबील थकल्याने वीज तोडणीसाठी आलेल्या महिला अधिकाऱ्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार पुण्यातून समोर आला आहे. पुण्यातील डेक्कन परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरती बोदे यांची 5 हजार 206 रुपयांची वीजबिल थकले होते. यामुळेच बोदे यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. ही थकबाकी मागण्यासाठी आलेल्या करुणा आधारी व रूपाली कुटे या वीज वितरणाच्या दोन महिला अधिकाऱ्यांसोबत या कुटूंबाचा वाद झाला. याच वादातून आरोपींनी महिलांना शिविगाळ करत त्यांना डांबून ठेवले.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मजल्यावरील लिफ्टचा दरवाजा बंद केला आणि आतमध्ये कुत्री सोडली. यानंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी डेक्कन पोलिसांना फोन लावून मदत मागितली.

डेक्कन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या महिलांची सुटका केली. या प्रकरणी ललित बोदे व आरती बोदे या दांपत्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Pune Crime News
Anandraj Ambedkar: भांडवल करणारे करत आहेत; बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत आनंदराज आंबेडकर यांच्या अप्रत्यक्षपणे टोला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com