Pune Crime News: सावधान! महापालिकेत बड्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन; उच्चशिक्षित तरुणाला घातला लाखोंचा गंडा

Fraud Case: या घटनेत आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV
Published On

सचिन जाधव

Pune News: राज्यात सध्या बेरोजगारी ही एक मोठी समस्या बनली आहे. उच्चशिक्षित असूनही लाखो तरुणाई अद्याप नोकरीच्या शोधात आहे. अशात सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत एका व्यक्तीला लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेत आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महापालिकेत सध्या जागा आहेत. मी तुम्हाला तेथे नोकरी (Job) मिळवून देऊ शकतो. त्यासाठी फक्त काही पैशांची गरज लागेल असे सांगून फसवणूक करण्यात आली आहे. सरकारी नोकरी आणि तेही महापालिकेत म्हटल्यावर फिर्यादी व्यक्तीने नोकरीसाठी आरोपीवर विश्वास ठेवला.

Pune Crime News
Pune Crime News: राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची कोयता-कुऱ्हाडीने वार करून हत्या, पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

त्यानंतर या तरुणाकडून आरोपीने लाखो रुपयांची मागणी केली. जून २०१९ ते नोव्हेंबर २०२१ या कालावधीत तरुणाने सर्व पैसे भरले. भास्कर (वय ३८, रा. सदाशिव पेठ) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. आरोपीने फिर्यादीना पुणे महापालिकेत नोकरीसाठी ५ लाख रुपये लागतील, असं आधी सांगितलं होतं.

त्यापैकी चार लाख रुपये अगोदर आणि उर्वरित एक लाख रुपये काम झाल्यावर द्यावे लागतील, असे सांगितले. त्यावर फिर्यादीने मोहोळ याच्या बँक खात्यात २ लाख २० हजार रुपये जमा केले. परंतु नोकरी न लागल्याने फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मिळालेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करून विश्रामबाग पोलिस अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News
Nashik Crime News: समस्या सुटल्या नाहीत म्हणून नैराश्येत गेला, रागाच्या भरात तरुणानं सल्ला देणाऱ्या महिलेलाच संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com