Car Accident: थरारक! कारच्या जोरदार धडकेत व्यक्ती हवेत फेकली गेली... भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

हा अपघात इतका भीषण होता की, सदर व्यक्ती हवेत दूरवर फेकली गेली.
Car Accident
Car AccidentSaam TV

गोपाळ मोटघरे

Pune News : पिंपरी चिंचवड शहरात अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या कारने जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, सदर व्यक्ती हवेत दूरवर फेकली गेली. तसेच कार चालकाने त्या व्यक्तीला दूरवर फरपटत नेले. (Latest Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी बीआरटी रोडवर ही घटना घडली आहे. एका अज्ञात कारचालकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात उडवून चिरडले आहे. ५ मार्चला पहाटे झालेल्या या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत.

Car Accident
Accident News: पुणे-नाशिक महामार्गावर वारकऱ्यांना STची धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

अपघातात मॉर्निंग वॉक करणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी अज्ञात कारचालका विरोधात भा द वी ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मात्र अज्ञात कारचालकाचा अद्याप शोध लावण्यात वाकड पोलिसांना अजून तरी यश आले नाही.

Car Accident
Nashik Accident : कुटुंबावर काळाचा घाला; नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

आज देखील पुण्यातील मावळ येथे अपघाताची एक मोठी घटना घडली आहे. बेंगलोर मुंबई हायवेवर शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. कात्रज देहूरोड बायपासच्या ताथवडे येथे एका टेम्पोचा अपघात झाला आहे. कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात अनेक शिवभक्त जखमी झालेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले आहेत. तर १० जण गंभीर जखमी असून २० किरकोळ जखमी आहेत. मल्हारगड ते लोणावळा शिलाटणे येथे शिवज्योत घेऊन हे शिवभक्त निघाले होते. बेंगलोर मुंबई हायवेवर पोहचले असता टेम्पोला मागून कंटेनरची जोरात धडक बसली त्यामुळे हा अपघात झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com