पुणे : ‘मरावे परी किर्ती रुपी उरावे’ असे म्हटले जाते. आयुष्य जगत असताना चांगलं काम करणारी लोकं नेहमीच आठवणीत राहतात. तर काहीजण अवयव दान करून अजरामर होता. याचाच प्रत्यय पुण्यातून आला आहे. पुण्यात एका ब्रेनडेड महिलेच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे पाच जणांचे प्राण वाचले आहेत. (Pune Brain-Dead Woman Organ Donation Saves 5 People Life)
देशासाठी सीमेवर लढणाऱ्या दोन गरजू जवानांसह इतर तीन रुग्णांना या महिलेनं अवयवदान करून अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्राप्त माहितीनुसार, एका सेवानिवृत्त लष्करी जवानाच्या पत्नीवर पुण्यातील सदर्न कमांड रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र, त्या ब्रेनडेड झाल्या.
जीवंत असूनही त्या मृत्यूच्या दारात होत्या. त्यानंतर या महिलेच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. ब्रेनडेड महिलेच्या कुटुंबीयांनी याबाबत लष्करी रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. या सोबतच रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयकांशीही चर्चा केली. यानंतर त्या कुटुंबाने अवयवांची अत्यंत गरज असलेल्या रुग्णांना तरुण महिलेचे अवयव दान केले जावेत अशी इच्छा व्यक्त केली. (Pune Marathi News)
कमांड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या मदतीने ही प्रत्यारोपनाची शस्त्रक्रिया पार पाडली. या महिलेमुळे पाच जणांना जीवदान मिळाले आहे. महिलेच्या शरीरातील मूत्रपिंडासारखे महत्त्वाचे अवयव भारतीय लष्करात सेवा बजावणाऱ्या दोन जवानांच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले.
तर डोळे, कमांड रुग्णालयातील सशस्त्र दलाच्या वैद्यकीय महाविद्यालय संकुलातील नेत्रपेढीत सुरक्षितपणे जतन करून ठेवण्यात आले. तर महिलेचे यकृत हे पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील गरजू रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आलं.
दरम्यान, दोन जवानांना पुनर्जीवन बहाल करणाऱ्या अवयवदात्या महिलेचे नाव लष्करी अधिकाऱ्यांनी गोपनीय ठेवण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांचे नाव देण्यात आलेले नाही.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.